राहुल पाटील शिंदे सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व : ऍड. बाबासाहेब खिलारी विखे समर्थकांच्या वतीने राहुल पाटील शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान...
राहुल पाटील शिंदे सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व : ऍड. बाबासाहेब खिलारी
विखे समर्थकांच्या वतीने राहुल पाटील शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान
पारनेर विशेष प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेते राहुल शिंदे पाटील यांचा वाढदिवस रांजणगाव मशीद याठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी मित्र मंडळाच्या वतीने राहुल शिंदे पाटील यांचा सहपत्नीक जाहीर सत्कार व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील मोहनराव रोकडे मा. मुख्याध्यापक प्रकाशराव इघे सर यावेळी उपस्थित होते.
या वेळी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिलारी म्हणाले राहुल शिंदे पाटील हे खऱ्या अर्थाने युवकांच्या मनातील नेतृत्व आहे ते तालुक्याच्या दृष्टीने एक बहुआयामी सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्तिमत्त्व असून सर्वांना सोबत घेऊन जात काम करण्याची त्यांची पद्धत चांगली असून सुपा जिल्हापरिषद गटामध्ये त्यांनी विकासाचे मोठे काम उभे केले आज आहे. खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे सुरू असलेले कार्य हे सुपा परिसराला व तालुक्याला नक्कीच यापुढील काळात पुढे घेऊन जाईल त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस मी माझ्या खिलारी परिवाराच्या वतीने व सर्व तालुक्यातील विखे समर्थकांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.