सावरगावच्या सरपंच पदी वैशाली चिकणे यांची बिनविरोध निवड चिकणे कुटुंबाची मिरवणुकीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक मदत पारनेर/प्रतिनिधी :...
सावरगावच्या सरपंच पदी वैशाली चिकणे यांची बिनविरोध निवड
चिकणे कुटुंबाची मिरवणुकीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक मदत
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजले जाणारे गाव सावरगाव या गावच्या सरपंचपदी वैशाली पर्वती चिकणे यांची मंगळवार दि. ७ रोजी बिनविरोध निवड झाली.
सावरगावच्या तत्कालीन सरपंच सुरेखाताई मगर यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी वैशाली पर्वती चिकणे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतु समोरून कोणताही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्यांची सरपंचपदी निवड बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
या सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अधिकारी उंडे, भालेकर व जगदाळे यांनी काम पाहिले.
या निवड प्रक्रियेमध्ये सावरगाव ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच प्रदीप गुगळे, मा. सरपंच सुरेखाताई मगर, शांताराम शिंदे, विष्णू माने, बाळासाहेब चिकणे, देवराम मगर, बाळासाहेब शिरतार, संतोष घनदाट, संतोष आचार्य व पर्वती चिकणे यांचे विशेष सहकार्य लाभले. गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी नवनिर्वाचित सरपंच वैशाली चिकणे यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छाही दिल्या. चिकणे कुटुंबाने सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर अनावश्यक खर्चाला फाटा देत गावातील सामाजिक कार्यासाठी वर्गणी दिली.
दरम्यान सरपंचपदी निवड झालेल्या वैशाली चिकणे यांच्या कुटुंबाची गावच्या सामाजिक, अध्यात्मिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी सहभाग असतो. सरपंचपदी निवड झाल्यानंतर वैशाली चिकणे यांनी यापुढील काळात सावरगावच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे मत व्यक्त केले तसेच गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी यांचे यावेळी आभार मानले.
तत्कालीन सरपंच सुरेखाताई मगर यांनी शब्द पाळला..
सावरगाव ग्रामपंचायत ही निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांनी एकत्रित प्रथम एक वर्ष सरपंचपदी सुरेखाताई मगर यांना संधी दिली होती. ठरल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सरपंच सुरेखाताई मगर यांनी ग्रामपंचायत मध्ये आपला राजीनामा सादर करून ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे सरपंच मगर यांनी त्यांच्या गटाला दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे आता नवनिर्वाचित सरपंच म्हणून वैशाली चिकणे यांची सावरगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
चिकणे कुटुंबाने अनावश्यक खर्चाला फाटा देत जपली सामाजिक
सावरगावच्या सरपंच पदी वैशाली पर्वती चिकणे यांची निवड झाली निवडीनंतर कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता व गुलालाची उधळण न करता शांततेमध्ये आनंद साजरा केला व साध्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी आर्थिक मदत दिली. त्यांनी सामाजिक मदत दिल्या नंतर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य यांनी चिकणे कुटुंबाचे आभार मानले असून त्यांनी दाखवलेले दातृत्व हे नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे.