गुणवत्ता व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा माफक दरात : डॉ भाऊसाहेब खिलारी रुग्णालये ही देशाची जीवनवाहिनी आहेत. किरकोळ आजारापासून ते गंभीर आजारापयर्यं...
गुणवत्ता व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा माफक दरात : डॉ भाऊसाहेब खिलारी
रुग्णालये ही देशाची जीवनवाहिनी आहेत. किरकोळ आजारापासून ते गंभीर आजारापयर्यंत रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्याचे कार्य साई सावली हॉस्पिटल करत आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट व अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज असे पहिले रुग्णालय आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य हे साई सावली हॉस्पिटल करत आहे. आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत हे तत्व हॉस्पिटलने कायम जपले आहे. २४ तास अत्यावश्यक सेवा देऊन अनेकानेक रुग्णांचे प्राण वाचविण्याचे कार्य आजतयागत आम्ही करत आलो आहोत व यापुढेही आमचा करण्याचा मानस आहे. रुग्णांचा विश्वास मिळवण्याबरोबरच त्याला उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कार्यही रुग्णालय व्यवपथापन करत आहे.
म्हणून रुग्णांना उपचारासाठी आमच्या हॉस्पिटलला पसंती मिळत आहे. येथे अत्यावश्यक औषधांपासून अतिदक्षता विभाग मेंदुविकारापासून मुत्रविकारापर्यंतच्या सर्व शस्रक्रिया केल्या जातात
त्याचबरोबर एम.आर.आय., सी.टी स्कॅन, डिजिटल एक्स रे
अल्ट्रासोनोग्राफी, अस्थिरोग रेस्पायरेटरी, नाक, कान, घसा , पॅथोलॉजी, कृत्रिम सांधेरोपण ,अनेस्थेशिया, बालरोग लसीकरण, बाह्यरुग्ण सेवा, जनरल सर्जरी, अपघात, फिजिओथेरपी, हेल्थ चेकअप, कॅशलेस इन्शुरन्स तसेच हृदयविकारावरील सर्व उपचार केले जातात. आतापर्यंत अनेक मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून १०००० हून अधिक गरजू रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले या काळात वैद्यकीय क्षेत्राचा खऱ्या अर्थाने कस लागला सुरुवातीच्या काळात उपचार माहित नसताना देखील रुग्णांना धीर देण्याचे कार्य आमच्या हॉस्पिटलने केले.
कोविड रुग्णाचे नातेवाईक सुद्धा या काळात रुग्णांजवळ येत नव्हते या वेळी आमच्या हॉस्पिटल व स्टाफने स्वत: जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचविण्याचे कार्य केले. व हजाराहून अधिक रुग्णांना ऑक्सिजन सह इतर सुविधा पुरवण्याचे कार्य केले तसेच पंचवीस ते तीस हजार बाह्यविभाग रुग्णांना केवळ औषधोपचार देऊन बरे केले. यापुढे जाऊन कोविड नंतर घ्यावयाची काळजी तसेच या रुग्णांना मोफत उपचार देण्याचे कार्यही केले. याचीच पावती म्हणून सावली प्रतिष्ठाण व साई सावली हॉस्पिटलने नुकताच कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करून त्यांचा गुणगौरव केला.
सावली प्रतिष्ठाण व सावली स्कूल ऑफ नर्सिंग यांच्या सहकार्याने भविष्यातही निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करून समाजऋणातून मुक्त होण्याचा मानस साई सावली हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी केला.