युवकांचा गळ्यातील ताईत हसतमुख व्यक्तिमत्त्व किरण कोकाटे किरण कोकाटे पारनेर तालुक्याच्या राजकारणाचे भविष्य विखे समर्थक म्हणून तालुक्याचा राजक...
युवकांचा गळ्यातील ताईत हसतमुख व्यक्तिमत्त्व किरण कोकाटे
किरण कोकाटे पारनेर तालुक्याच्या राजकारणाचे भविष्य
विखे समर्थक म्हणून तालुक्याचा राजकारणात सक्रिय
युवकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर करत आहेत काम
पारनेर विशेष प्रतिनिधी :
किरण कोकाटे पारनेर तालुक्यातील एक उदयन्मुख युवा नेतृत्व सध्या भारतीय जनता पार्टीच्या पारनेर शहराध्यक्ष पदी कार्यरत असून तालुक्यात विखे समर्थक म्हणून सध्या ओळखले जातात. किरण कोकाटे हे युवकांमध्ये लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व असून आणि नेहमी हसतमुख असलेले हे व्यक्तिमत्व आज पारनेर तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना पारनेर शहर व परिसरात मोठे युवकांचे संघटन त्यांनी उभे केले आहे. खासदार सुजय दादा विखे यांचे अतिशय जवळचे सहकारी किरण कोकाटे समजले जातात खासदार विखे यांच्यामागे त्यांनी मोठी युवकांची फळी उभी केली आहे.
युवा संघटन तगडे असलेले किरण कोकाटे सध्या भारतीय जनता पार्टीच्या पारनेर शहर अध्यक्ष पदी कार्यरत असून पारनेर शहरातील सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवत आहेत खासदार विखे यांनी घेतलेल्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून पारनेर शहर व परिसरातील अनेक जेष्ठ दिव्यांग अपंग गरीब कुटुंबांना त्यांनी वैयक्तिक लाभ मिळवून दिला आहे. युवकांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रश्नावर ते नेहमी काम करत आहेत. हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेले किरण कोकाटे ही युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय असून त्यांचा मित्रपरिवार तालुक्यात खूप मोठा आहे युवाहृदयसम्राट ही बिरुदावली कमी पडेल असे असलेले हे व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्याच्या राजकारणाचे भविष्य आहे. अनेक चढ-उतार पहात आपली राजकीय वाटचाल करणारे किरण कोकाटे आज विखे समर्थक म्हणून तालुक्याला परिचित झाले आहे.
युवा नेते किरण कोकाटे समाजा मध्ये काम करत असताना समाजाचे अनेक प्रश्न घेऊन ते सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात कोरोना काळातही त्यांनी उत्तम असं काम केले तसेच सामाजिक कामाच्या माध्यमातून ते नेहमी सक्रिय असतात. किरण कोकाटे बोलताना नेहमी म्हणतात की खासदारसाहेब सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासाचे कामे मार्गी लावायचे आहे. युवकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करायचे असून शेतकऱ्यांच्या हिताचे ही पाणी प्रश्न असून ती सोडवण्यासाठी हि मी यापुढील काळात काम करणार आहे तसेच मुख्य तालुक्याच्या पाणी प्रश्नावर ही यापुढील काळात मला काम करायचे आहे व तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामुख्याने खासदार सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून काम करणार आहे.
सक्रिय युवा नेतृत्व असलेले किरण कोकाटे जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करतात. उदयन्मुख प्रगल्भ विचारांच्या युवा नेतृत्वाला पुढील राजकीय सामाजिक वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा..