पोखरी सोसायटीत झालेला पराभव हा आमच्यासाठी विजय : सरपंच प्रकाश गाजरे लंके गटाने चाळीस वर्षाच्या राजकारणाला दिले होते आव्हान जिल्हा परिषद निव...
पोखरी सोसायटीत झालेला पराभव हा आमच्यासाठी विजय : सरपंच प्रकाश गाजरे
लंके गटाने चाळीस वर्षाच्या राजकारणाला दिले होते आव्हान
जिल्हा परिषद निवडणुकीत ताकद दाखवणार
पारनेर प्रतिनिधी :
पोखरी सेवा सोसायटी मध्ये शिवसेनेचा भगवा फडकला असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गाजरे म्हणाले की पोखरी सेवा सोसायटी मध्ये आमचा झालेला पराभव हा आमच्यासाठी विजय असून सेवा सोसायटीच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने चाळीस वर्षाच्या राजकारणाला आव्हान दिले होते. प्रस्थापित राजकारण मोडीत काढण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. सेवा सोसायटीच्या माध्यमातून निवडून आलेल्या सत्ताधार्यांच्या विरोधात शेतकरी वर्गाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा नेहमी प्रयत्न करत राहणार आहोत. पोखरी सेवा सोसायटी मध्ये निवडून आलेले सर्व उमेदवारांचे मी आमदार निलेश लंके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो. असेही ते यावेळी म्हणाले कारण ते निवडून आलेले उमेदवार सर्वच माझे सहकारी असून त्यांच्या विरोधात आमचा लढा हा नव्हताच आमचा लढा हा प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात असून हा लढा सुरू राहणार आहे
आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही प्रस्थापित राजकारणाला सुरुंग लावल्या शिवाय शांत बसणार नाही. पोखरी सेवा सोसायटीचे कार्यालय हे सुद्धा ४० वर्ष सत्ता उपभोगून ही त्यांना ते स्वमालकीचे करता आले नाही ते आजही भाडेतत्त्वावर दुसऱ्याच गावात खडकवाडी या ठिकाणी सुरू आहे. पोखरी सेवा संस्थेचा वापर आज पर्यंत प्रस्थापितांनी स्वताचा व्यवसाय करण्यासाठी केला असा थेट आरोप सरपंच प्रकाश गाजरे यांनी यावेळी केला सेवा संस्थेचे कार्यालय पोखरी या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही लवकरच सर्वसामान्य सभासदांना सोबत घेऊन लढा उभारणार आहोत आणि पोखरी येथे नवीन प्रशस्त इमारत उभी राहत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील. असे यावेळी सरपंच प्रकाश गाजरे यांनी नमूद केले आहे.
सेवा सोसायटी मध्ये १५० मतदार सभासद बोगस असल्याचा आरोप
पोखरी सेवा सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये शिवसेना गटाने एक हाती वर्चस्व मिळवत राष्ट्रवादी प्रणित आघाडीला धोबीपछाड दिली. पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते सरपंच प्रकाश गाजरे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब वाळुंज, पांडुरंग आहेर, भाऊसाहेब कोकाटे, नामदेव करंजेकर, सिताराम पवार, योगेश पवार, भाऊसाहेब हांडे, शांताराम काशीद, दिलीप मोरे, संतोष कारंडे, संतोष मोरे, म्हातु करंजेकर, पत्रकारांशी संवाद साधताना पोखरी सेवा सोसायटी मध्ये जवळपास १५० पेक्षा जास्त सभासद बोगस असल्याचा आरोप केला आहे. तसेच पैशाचा झालेला भरमसाठ वापर यामुळे ही निवडणूक प्रस्थापितांनी पुन्हा राखली असून नैतिक रित्या आमचा विजयच झाला आहे. पैशाचा झालेला गैरवापरामुळे आमचा पराभव झाला.
COMMENTS