भाजपचे पारनेर शहराध्यक्ष किरण कोकाटे यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा किरण कोकाटे मित्र परिवाराच्या वतीने आयोजन वाढदिवसानिमित्त राबविणार सामाज...
भाजपचे पारनेर शहराध्यक्ष किरण कोकाटे यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा
किरण कोकाटे मित्र परिवाराच्या वतीने आयोजन
वाढदिवसानिमित्त राबविणार सामाजिक उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुका भाजपचे नेते व पारनेर शहराध्यक्ष किरण कोकाटे यांचा बुधवार दि. ८ जून रोजी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी ७ वाजता मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा अभिष्टचिंतन सोहळा पारनेर या ठिकाणी नवी पेठ हरेश्वर ऍग्रो येथे होत असून कोकाटे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत विविध सामाजिक उपक्रमांचे ही यावेळी आयोजन केले आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी पारनेर तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी खासदार सुजयदादा विखे पाटील युवा मंच चे सर्व पदाधिकारी तालुक्यातील विखे समर्थक तसेच किरण कोकाटे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती किरण कोकाटे यांचे मित्र युवा नेते स्वप्नील औटी, अक्षय देशमुख, योगेश आढाव, सचिन धोत्रे, सौरभ जेऊरकर, अनिकेत साबळे, योगेश औटी, राहुल औटी, अविनाश चौरे, यांनी दिली आहे.
पारनेर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने किरण कोकाटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून किरण कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम यावेळी राबविण्यात ही येणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी बोलताना युवानेते स्वप्नील औटी म्हणाले की किरण कोकाटे आपला वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत असतात या वेळेस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक उपक्रम राबवत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा मानस असून पारनेर शहरातील व परिसरातील मित्रपरिवाराने व युवकांनी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.