जवळ्यात शेतकऱ्याने बिबट्याच्या तावडीतून वाचविले शेळीचे प्राण जवळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थ भयभीत वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंद...
जवळ्यात शेतकऱ्याने बिबट्याच्या तावडीतून वाचविले शेळीचे प्राण
जवळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थ भयभीत
वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा : राजेश्वरी कोठावळे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर येथील जवळा पठारे मळा शिवारात कारभारी बाबुराव पठारे नारायण पठारे यांचा १० वर्षाचा मुलगा शेळ्या चारत असताना शेजारच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळी वर हल्ला करत मानेला पोटाला चावा घेतला हा प्रकार मुलाने पाहिला असता त्याने आरडा ओरड केली कारभारी पठारे यांनीही लांबून दगडाने मारत हुसकवण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या काही शेळीची जबड्यात धरलेली मान सोडली नाही शेवटी पठारे यांनी हातातील बदलीने बिबट्याला मारत हाकलले तेव्हा बिबट्याने पळ काढला,
गेल्या अनेक महिन्यापासून जवळा परिसरात बिबट्यांचे वास्तव्य चांगलेच वाढले आहे.
सकाळ, दुपार, रात्री अपरात्री बिबट्यांचे दर्शन हे नित्याचेच झाले आहे. त्यांचा पाळीव प्राण्यांना उपद्रव वाढत आहे. आजपर्यंत अनेक शेळ्या, कुत्रा बकरे, घोड्या, कोंबड्या बिबट्यांनी फस्त केल्या आहेत. सुदैवाने मानवी हल्ला या परिसरात अजून झाला नाही परंतु आता ती ही अघटीत घटना घडण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. कारण बिबट्यांचे वाढते धाडस ही डोकेदुखी या परिसराला नेहमी लागून आहे.
बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपसरपंच गोरख पठारे, माजी सभापती सुदाम पवार व गावातील नागरिकांनी वेळोवेळी वनखात्याला ठराव देऊन निवेदने देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली परंतु वाखात्याचे कर्मचारी फोन उचलत नाही जुमानत ही नाही व काही उपाय योजना करत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
ताबडतोब बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने पाऊल उचलावे अशी मागणी जवळा परिसरातील नागरिक करत आहेत.
जवळा परिसरामध्ये उसाचे क्षेत्र आहे त्यामुळे परिसरात बिबट्या वारंवार ग्रामस्थांना दिसतो या भागात बिबट्या असून पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करतो या घटना वारंवार घडत असल्यामुळे शेतकरी वर्ग व ग्रामस्थ हैराण झाले आहेत बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याने त्वरित या भागांमध्ये पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. तरी पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा.
राजेश्वरी कोठावळे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, अहमदनगर)