वेब टीम : पॅरिस या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून तेल आयातीवर निर्बंध घालण्यासाठी युरोपियन संघातल्या काही नेत्यांनी सहमती दर्शवल...
वेब टीम : पॅरिस
या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून तेल आयातीवर निर्बंध घालण्यासाठी युरोपियन संघातल्या काही नेत्यांनी सहमती दर्शवली आहे.
युक्रेनला मदत करण्याच्या दृष्टीनं काल आयोजित शिखर परिषदेत या संदर्भात विविध मुद्यांवर चर्चा झाली.
या कारवाईमुळे वर्षाच्या अखेरीला रशियाकडून युरोपीय संघाला होणारी ९० टक्के तेल आयात बंद होईल, असं युरोपिअन संघाच्या प्रमुख उरसुला व्हेन डेर लिअन यांनी सांगितलं.
दरम्यान, या २७ देशांच्या गटानं युध्दग्रस्त युक्रेनला ९ बिलिअन युरोची मदत देण्यासही मान्यता दिली आहे, असं युरोपीय संघाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी सांगितलं.