ग्राहकांचे प्रश्न संतोष सोबले यांनी प्राधान्याने सोडवावेत : भालेकर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून निवडीनंतर सन्मान पारनेर प्रतिन...
ग्राहकांचे प्रश्न संतोष सोबले यांनी प्राधान्याने सोडवावेत : भालेकर
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून निवडीनंतर सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील सोबलेवाडी येथील पत्रकार संतोष सोबले यांची नुकतीच ग्राहक संरक्षण समितीच्या अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड जाहीर झाली. यावेळी विविध संघटना, संस्था तसेच पत्रकार संघ व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात येत आहे. पारनेर या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार शशिकांत भालेकर म्हणाले पत्रकार संतोष सोबले हे एक सामाजिक पत्रकारिता करतात त्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्यांवर व प्रश्नांवर त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. पत्रकारिता करत असताना ग्राहकांच्या प्रश्नांना समस्यांना न्याय देताना त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
यापुढील काळात काम करताना सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी प्राधान्याने ग्राहकांचे प्रश्न सोडवावेत या माध्यमातून अनेक विषय मार्गी लागतील असे यावेळी सत्कार प्रसंगी पत्रकार शशिकांत भालेकर यांनी मत व्यक्त केले. व संतोष सोबले यांच्या पुढील सामाजिक-राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या..
यावेळी अंबिका उद्योगसमूहाचे राजू बेलोटे, बाजार समितीचे अधिकारी आढाव, दत्ता ठाणगे, नंदू तराळ, राजू ठुबे, सुनील गाडगे, संदीप थोरात, संदीप मोढवे, अक्षय गवळी, संपत मांढरे, करंदी येथील सेवा सोसायटीचे ठाणगे सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कार प्रसंगी उपस्थित होते. यावेळी ग्राहक संरक्षण समितीचे नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष संतोष सोबले यांनी उपस्थित मित्र परिवाराचे व मान्यवरांचे आभार मानले.