वाढदिवस विशेष.. सचिन पाटील वराळ सर्वसामान्य जनतेचा आधार संदीप पाटील यांच्या स्वप्नातील काम करण्यासाठी धडपड युवकांच्या गळ्यातील हृदयसम्राट वि...
वाढदिवस विशेष..
सचिन पाटील वराळ सर्वसामान्य जनतेचा आधार
संदीप पाटील यांच्या स्वप्नातील काम करण्यासाठी धडपड
युवकांच्या गळ्यातील हृदयसम्राट
विखे पाटील कुटुंबाशी एकनिष्ठ
गणेश जगदाळे/पारनेर :
निघोज ग्रामपंचायत सदस्य व संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष युवा नेते सचिन पाटील वराळ म्हणजे असंख्य युवकांच्या हृदयातील सम्राट संदीप पाटील वराळ हे नाव पारनेरच्या क्षितिजावर घेतल्यानंतर उभी राहते ती धगधगती मशाल सर्वसामान्य गरीब जनतेच्या हितासाठी अविरत कार्य करणारे ते अजरामर नाव संदीप पाटलांचा राजकीय सामाजिक वारसा चालवण्याची जबाबदारी निधनानंतर सचिन भाऊंचा खांद्यावर अचानक येऊन पडली. असंख्य युवकांना संदीप पाटील गेल्यानंतर आपला पाठीराखा कोण ? हा प्रश्न निर्माण झाला होता. पण सचिनभाऊंनी संदीप पाटलांची थोडीही उणिव भासू दिली नाही.
एका कसलेल्या राजकारण्याप्रमाणे निघोज व परिसरामध्ये राजकीय सामाजिक काम सचिन भाऊंनी वेगाने सुरू केले. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडविली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, निघोज सरपंच पद मिळवत संदीप पाटलांच्या स्वप्नातिल निघोज गाव निर्माण करण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. तालुक्याच्या प्रस्थापित राजकारणाला स्वीकारून संघर्ष करत कुरघोडीच्या राजकारणात टिकून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. संदीप पाटील वराळ गेल्यानंतर सचिन भाऊंनी जिल्हा परिषद गटावर एक हाती सत्ता मिळवली निघोज ग्रामपंचायत ताब्यात घेतली.
या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनतेचे प्रश्न सचिनभाऊ आज सोडवत आहेत. वराळ कुटुंबाचे विखे कुटुंबाशी असलेले स्नेहाचे कौटुंबिक संबंध हे जिल्ह्याला माहिती आहेत. नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील हे वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे सचिन भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून अडी अडचणीमध्ये व संकटात साथ देत आहेत.
निघोज परिसरांमध्ये सचिन पाटील वराळ हे काम करत असताना त्यांनी समाज सेवेचे मोठे काम उभे केले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन ची स्थापना करून निघोज परिसरामध्ये त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मोफत वाटप तालुक्यातील सर्वात मोठी भव्य क्रिकेट स्पर्धा भरवून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिवाळीमध्ये गोरगरिबांची दिवाळी हा सामाजिक उपक्रम राबवून एक हजार पेक्षा जास्त कुटुंबांना दिवाळी भेट दीनदलित गरीब कुटुंबातील समाजासाठी वेळोवेळी किराणा वाटप,
मळगंगा देवी यात्रा उत्सवामध्ये भाविक भक्तांसाठी मोफत पाणपोई, धार्मिक कार्यासाठी देणगी, असे अनेक सामाजिक उपक्रम सचिन पाटील वराळ हे राबवत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावत आहेत या माध्यमातून स्थानिक रस्ते सभामंडप वीज पाणी पुरवठा योजना या कामांना मतदारसंघांमध्ये गती आली आहे अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. संदीप पाटील वराळ यांच्या स्वप्नातील निघोज गाव घडवण्यासाठी सचिन पाटील वराळ यांच्यासोबत संपूर्ण संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन दिवसाची रात्र करत आहे. निघोज गाव व परिसरामध्ये तसेच जिल्हा परिषद गटांमध्ये विखे-पाटलांच्या माध्यमातून त्यांनी विविध विकासाची कामे मार्गी लावली आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी हित निघोज गावच्या विकासासाठी सचिन पाटलांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
निघोज शहरामध्ये अद्ययावत अशी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभे राहण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपयाचा निधी सचिन पाटील वराळ यांच्या पाठपुराव्याने मिळाला आहे. गावच्या व परिसराच्या विकासासाठी सचिन पाटील वराळ हे तत्पर आहेत सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही सचिनभाऊ सर्वात पुढे असतात शेतकऱ्यांच्या साठी वेळोवेळी आंदोलनात्मक भूमिका सचिन भाऊ घेत असतात कुकडी कालव्याला योग्य वेळेत आवर्तन मिळाले पाहिजे यासाठी सचिन पाटील वराळ यांनी आंदोलन पुकारले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सचिन पाटील वराळ यांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना सेंटर सुरू केले.
या सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले यामुळे गरीब दीनदलित सर्वसामान्य घटकातील रुग्णांना आधार मिळाला निघोज परिसरातील निघोज जवळा देवीभोयरे आळकुटी रांधे दरोडी पिंपरि जलसेन वडनेर बुद्रुक या भागातील अनेक रुग्णांवर योग्य ते उपचार कोरोना काळात संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनने सुरू केलेल्या कोरोणा सेंटरमध्ये झाले आहे. कोरोना काळामध्ये जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून सचिन पाटील वराळ यांनी कोरोना रुग्णांची मनोभावे सेवा केली आहे संपूर्ण लोक डाऊन असताना निघोज गावामध्ये ग्रामस्थांना वेळोवेळी मदत पोहोचविण्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन नेहमी सक्रीय असल्याचे लक्षात येते संपूर्ण लॉकडाउन कालावधीमध्ये निघोज येथे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक लोकांना आधार देण्याचा व त्यांच्या पर्यंत किराणा व भाजीपाला पोहोचविण्याचा प्रयत्न संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला होता.
सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणे ही खऱ्या अर्थाने सचिन पाटील यांची परिसरामध्ये ओळख निर्माण झाली आहे. अशा या सुस्वभावी सुसंस्कृत पारनेर तालुक्याचे भविष्य असलेल्या युवा नेत्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..