प्र. ग. खिलारी कन्या विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) रयत शिक्षण संस्थेचे प्रभाकरराव गणपतराव खि...
प्र. ग. खिलारी कन्या विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे)
रयत शिक्षण संस्थेचे प्रभाकरराव गणपतराव खिलारी माध्यमिक कन्या विद्यालय टाकळी ढोकेश्वर मध्ये बुधवार दिनांक १५ रोजी नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अहमदनगर, बीड, पुणे, नाशिक इत्यादी जिल्ह्यातून नव्याने प्रवेशित झालेले विद्यार्थी व संबंधित पालकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक ढुस एस. के. सरांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विद्यालयाचे यशस्वी परंपरा व विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य मांडले उपस्थित मान्यवरांनी मधून सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे मा. सरपंच राजेंद्र रोकडे, प्राध्यापक किसनराव पायमोडे, दत्ताभाऊ टेकुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालया प्रति समाधान व्यक्त केले यावेळी मोहनराव रोकडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पेन वाटप केले. तर मा सरपंच राजेंद्र रोकडे यांनी वस्तीगृहातील मुलींसाठी धान्याचे एक देणगी स्वरूपात दिले. सदर कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य मा. पंडितराव झावरे, सुनील खिलारी, तारकराम झावरे, ओंकार झावरे, आबा ढेंबरे, ज्ञानदेव खामकर तसेच पालक वर्ग, सर्व सेवक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्ण रोकडे सर यांनी केले तर शिंदे एस एस यांनी आभार व्यक्त केले.