सौ. छाया कोकाटे सलग पाचव्यांदा एम. डी. आर.टी. च्या मानकरी कोकाटे मुळे पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा अमेरिकेच्या परिसंवादासाठी निव...
सौ. छाया कोकाटे सलग पाचव्यांदा एम. डी. आर.टी. च्या मानकरी
कोकाटे मुळे पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमेरिकेच्या परिसंवादासाठी निवड
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
तालुक्यातील कर्जुले हर्या येथील एल. आय. सी विमा प्रतिनिधी सौ छाया कांतीलाल कोकाटे या सलग पाचव्यांदा एम. डी. आर. टी. (अमेरिका) या सन्मानाच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत होणाऱ्या सत्काराचा बहुमानही त्यांना लाभणार आहे.
सौ. कोकाटे यांनी हजारो ग्राहकांना विमा क्षेत्राशी जोडून अल्पावधीतच उद्दिष्ट पूर्ण केले आहे.९५ शाखेतून कोकाटे यांनी प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. अमेरिका (नॅशविले टेनेसी) येथे २५ ते २८ जून २०२३ रोजी होणाऱ्या परिसंवादासाठी सौ. कोकाटे उपस्थित राहणार आहे. नगर शाखेतील प्रथम एम. डी. आर. टी. (अमेरिका) हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकाटे यांचा शाखाधिकारी श्री. जोशी साहेब, उपशाखाधिकारी भूजंग साहेब तसेच विकास अधिकारी धनंजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोकाटे यांना मिळालेला हा बहुमान पारनेर तालुक्याचा शिरपेचात मध्ये मानाचा तुरा ठरवणारा ठरला आहे.