महिलांचे सबलीकरण काळाची गरज : सरपंच चित्रा वराळ पारनेर प्रतिनिधी : महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्ष...
महिलांचे सबलीकरण काळाची गरज : सरपंच चित्रा वराळ
पारनेर प्रतिनिधी :
महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील, तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील. समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे काळाची गरज असल्याचे मत निघोजच्या सरपंच चित्रा वराळ यांनी केले.
निघोज (ता. पारनेर) येथे आझादी का अमृत महोत्सव या अभियानांतर्गत महिलांच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या सभेत पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांसाठी उमेद अभियानाविषयी जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महिला स्वयंसाहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिला सबलीकरण कशा पद्धतीने करता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाची ओळख व प्रास्ताविक पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक किरण चव्हाण यांनी केले. अभियानातून दशसूत्री, विविध शासकीय योजना, बँक कर्ज, खेळते भांडवल, पी. एम. एफ. एम. ई. योजना, ग्रामसंघ उत्पादक गट, अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांची माहिती वाबळे यांनी दिली ग्रामपंचायत सदस्य रूपाली गायखे अविता वरखडे, शबनूर इनामदार, जया वराळ, ग्रामसेवक दत्तात्रेय वाळके, तेजस्विनी बचत गटाच्या अध्यक्ष सविता गायखे, पुनम गायखे, उषा आतकर, बेबी सोनवणे आदी उपस्थित होते.