टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेशोत्सव सोहळा पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प...
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेशोत्सव सोहळा
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रवेशोत्सव सोहळा मोठा उत्साह मध्ये साजरा झाला या निमित्ताने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होत असलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात प्रभातफेरी काढून शाळेच्या प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन पुष्पवृष्टी करून भव्य असे स्वागत करण्यात आले. विद्येची देवता श्री सरस्वती पूजनाने प्रारंभ झालेल्या स्वागत समारंभप्रसंगी टाकळी ढोकेश्वरचे उपसरपंच रामभाऊ तराळ ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडूंगे, श्रीमती सुग्राबी हवलदार, केंद्रप्रमुख श्री.ठाणगे साहेब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नसरीन भाभी शेख, सदस्य किरण झावरे, नवोदय विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका उंडे मॅडम, कृषी सहाय्यक जाधव त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ग्रा.पं.सदस्या श्रीमती सुग्राबी हवलदार यांच्या वतीने चॉकलेटचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये सर्व शिक्षकवृंद यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश खिलारी यांनी केले. शाळेसंबंधीची माहिती व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक राजेंद्र ठुबे सर यांनी केले.
जिल्हा परिषद शाळांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत उंचावलेला दर्जा व शिक्षकांचे प्रयत्न त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा व पालकांचाही विविध उपक्रमातील सहभाग,विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबद्दल उपस्थित सर्वांनीच गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण झावरे सर, गाडेकर मॅडम, भनगडे मॅडम, तांबोळी मॅडम, घोलप मॅडम,तांबे मॅडम यांनी तसेच सर्व अंगणवाडी ताईंनी अतिशय परिश्रम घेतले.
COMMENTS