सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त विकास कामांचे उद्घाटन सामाजिक उपक्रमांनी होणार वाढदिवस साजरा अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्या...
सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त विकास कामांचे उद्घाटन
सामाजिक उपक्रमांनी होणार वाढदिवस साजरा
अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याचे युवा नेते संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष निघोज गावचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील वराळ यांचा वाढदिवस तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे सचिन पाटील वराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम निघोज व परिसरामध्ये संपन्न होत आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोगातून 2021-22 या वर्षीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन शिरसोली येथील दशक्रिया विधी घाट सुशोभीकरण करणे उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास निघोज येथे 40 ते 50 कचराकुंड्या यांचे वाटप यावेळी सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे अशी माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन च्या वतीने देण्यात आली आहे.
निघोज परिसरामध्ये सचिन पाटील वराळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करत साजरा करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले असून कपिलेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी हा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातील तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सचिन पाटील वराळ यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी जाणता राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच सचिन पाटील वराळ यांचा मित्रपरिवार आणि वराळ समर्थक यांना मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.