अण्णा हजारे आमच्यासाठी प्रेरणास्थान : गंगाराम बेलकर वाढदिवसानिमित्त भेटून दिल्या शुभेच्छा पारनेर प्रतिनिधी(गणेश जगदाळे) : देशाचे सामाजि...
अण्णा हजारे आमच्यासाठी प्रेरणास्थान : गंगाराम बेलकर
वाढदिवसानिमित्त भेटून दिल्या शुभेच्छा
पारनेर प्रतिनिधी(गणेश जगदाळे) :
देशाचे सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते पारनेर तालुक्याचे भूषण पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेत पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कोरठण खंडोबा देवस्थानचे उपाध्यक्ष गंगाराम बेलकर यांनी शुभेच्छा दिल्या..
यावेळी अण्णांसोबत बोलत असताना गंगाराम बेलकर म्हणाले अण्णा तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्रोत, मार्गदर्शक आहात तुमच्या सामाजिक कार्याला पाहून आम्ही सामाजिक काम करत आहोत. तुमच्या कार्याला पाहून आम्हाला सामाजिक कार्य करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळते. तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात पारनेर तालुक्याचे तुम्ही खर्या अर्थाने भूषण असून तुमचे कार्य हे समाजपरिवर्तनाची आहे.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देशाचे भूषण अण्णासाहेब हजारे यांना गंगाराम बेलकर यांनी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक वडगाव सावताळ येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे हे प्रमुख उपस्थित होते. कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्ट, गंगाराम बेलकर मित्र मंडळ, पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, परीधान कलेक्शन व समस्त ग्रामस्थ पारनेर यांच्या वतीने पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी अण्णा हजारे यांचे अभिष्टचिंतन केले.