श्री क्षेत्र शहाजापुर सुपा येथील दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान पारनेर प्रतिनिधी : श्री क्षेत्र शहाजापुर सुपा येथील दिंडीचे गुरुवारी पंढरपूरकड...
श्री क्षेत्र शहाजापुर सुपा येथील दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
पारनेर प्रतिनिधी :
श्री क्षेत्र शहाजापुर सुपा येथील दिंडीचे गुरुवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले असुन सुप्यात दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
श्री निळोबाराय दिंडी शहाजापुर सुपा येथुन गेल्या वर्षापासून जात आसुन हे यंदा दिंडीचे ३० वे वर्षे आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी दिंडी सोहाळे बंद होते. पांडूरंगाच्या कृपेने चालू वर्षी कोरोनाचे संकट टळले असुन दिंड्या, वारी पुर्ववत चालू झाली आहे. दोन वर्षे विठूमाऊलीची भेट झाली नसल्याने चालू वर्षी वारकऱ्यांना विठूरायाच्या भेटीची जास्तच ओढ लागली असुन यावेळी भक्ताच्यात जास्तच उत्साह जाणवत आहे.
वाल्मीक ऋषीच्या भूमीतून शहाजापुर येथुन निघालेली दिंडी दहा बारा दिवसांत पंढरपुर येथे पोहचते. पहाटे काकडा आरतीने दिवसाची सुरवात होते व वारकरी दिवसभर भजन भारुड गवळणी म्हणत नाचत बागडत दरमजल करत पंढरपूरला पोहचतात. यात संध्याकाळी प्रवचन हरिपाठ व रात्री हरीकिर्तन होते. वारीच्या वाटेवर गुरुवारी क्षेत्र रायतळे येथे ह.भ.प रमेश मासाळ शुक्रवारी देऊळगाव सिद्धी येथे ह.म.प.नितीन महाराज शिंदे शनिवारी मादळीत मिठू महाराज साबळे रविवारी पाटेगाव येथे शिवाजी महाराज काळे त्यानंतर ह.भ.प .मनिषा गवळी, ह. भ.प . प्रकाश महाराज देवगीरे, ह.भ.प बापु महाराज दळवी, ह.भ.प, रांजेंद्र शहाणे, ह.भ.प. कृष्ण कृपांकीत विकासानंद महाराज मिसाळ, ह.भ.प महादेव महाराज काळे याची किर्तन रुपी सेवा होणार असुन दिंडी मार्गावर दानशुर आन्नदात्याकडून वारकऱ्यांना चहा नाश्ता जेवन दिले जाते. या दिंडीत शहाजापुर सुप्या बरोबर वाळवणे रायतळे हंगा दळवीमळा कामरगाव पिंपळगाव कौडा अस्तगाव घोसपुरी रांजणगाव रोड सारोळा स्टेशन लोणी वांघुडेंखुर्द अपधुप यादी गावातील वारकरी सामील होत आसतात .
COMMENTS