वाडेगव्हाणमधून साऊंड सिस्टमची चोरी पारनेर प्रतिनिधी : घरासमोर लावण्यात आलेल्या टेम्पोतून सुमारे दोन लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम अज्ञात...
वाडेगव्हाणमधून साऊंड सिस्टमची चोरी
पारनेर प्रतिनिधी :
घरासमोर लावण्यात आलेल्या टेम्पोतून सुमारे दोन लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार वाडेगव्हाण येथील सचिन उत्तम खंदारे यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्याअनुषांगाने आवश्यक असलेली साउंड सिस्टम त्यांचा टेम्पो (क्र.एम.एच.४२ बी.७७८६) मध्ये ठेवण्यात आलेली असते. टेम्पो खंदारे यांच्या दारापुढे उभा असताना अज्ञात चोरटयांनी गुरूवारी रात्री १२.३० ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमधील साऊंड सिस्टमच्या १० मशिन तसेच वायर चोरून नेले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास टेम्पोमधील सामान सुरक्षित होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उठल्यानंतर सचिन खंदारे यांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यातील साहित्य त्यात आढळून आले नाही.
सामानाची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोध घेतला असता शेतातून अज्ञात चोरांच्या पाऊलखुणा आढळून आल्या. खंदारे हे नगर पुणे महामार्गालगत वास्तव्यास आहेत. चोरटयांनी रस्त्यावर वाहन लावून खंदारे यांच्या टेम्पोमधील •साऊंड सिस्टम रस्त्यापर्यत वाहून नेली व रस्त्यावरील वाहनात सिस्टम टाकून ते तेथून पसार झाले असावेत अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. खंदारे यांनी सुपे पोलिस ठाण्यात जाऊन खबर दिल्यानंतर सहाय्यक फौजदार पठाण यांनी घटनास्थळी जात पाहणी केली व पंचनामा केला.
त्यानंतर खंदारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पठाण हे पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS