पारनेरच्या राजकारणातील राजहंस स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील पारनेर तालुक्याच्या एका लोकमान्य व लोकप्रिय लोकनेत्याची अर्थात स्व. आमदार वसंतर...
पारनेरच्या राजकारणातील राजहंस स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील
पारनेर तालुक्याच्या एका लोकमान्य व लोकप्रिय लोकनेत्याची अर्थात स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांची 79 व्या जंयती. या निमित्ताने तालुक्यात व जिल्ह्यात "दादा" या टोपण नावाने आदरयुक्त दबदबा असलेल्या तालुक्याच्या महान भुमिपुञाच्या राजकीय पटलावरील स्मृतीवर टाकलेला प्रकाश.
अहमदनगर जिल्हात काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते, सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील एक आभ्यासु व्यक्तीमत्व पारनेरचे विकासपुरुष म्हणून माजी आ.वसंतराव झावरे यांची ओळख होती.
राजकारणातील निस्वार्थी, निष्कलंक, गोरगरींबांचा आवाज म्हणजेच पारनेरचे माजी आमदार वसंतराव कृष्णराव झावरे पाटील .
आ. दादा पारनेर च्या राजकारणात १९७८ पासून सक्रिय होते.१९७८ पासून राजकारणात ते मा. शरद पवार साहेब यांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जात.१९७८ पूर्वी भूविकास बँकेमध्ये त्यांनी मँनेंजर म्हणून काम केले.भूविकास बँकेच्या माध्यमातून पारनेर,संगमनेर,कर्जत,नगर येथे काम केले.पारनेर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना भूविकास बँकेच्या माध्यमातून स्वावलंबी व स्वयंपुर्ण होण्यासाठी वसंतराव झावरे यांनी प्रभावीपणे काम केले.
पारनेरच्या राजकारणात १९७९ ते १९९० पर्यत १२ वर्षे त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले.१९९५ ते २००५ पर्यत त्यांनी पारनेरचे आमदार पद भूषविले.पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत बाळासाहेब विखे पा.,सॉ.गुलाबराव शेळके,माजी आ.बाबासाहेब ठुबे,यांच्या बरोबरीने काम करताना त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.पारनेरचे आमदार असताना पिंपळगाव जोगे प्रकल्प, ढवळपुरी काळू प्रकल्प,सावरगाव,भांडगाव लघुप्रकल्प पुर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पारनेर तालुक्याला वरदान ठरणारा मांडओहळ प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पाटबंधारे मंत्री आबासाहेब निंबाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला वा तो मार्गी लावालाच.
के के रेंज प्रकरणी सरंक्षणमंत्री शरद पवार असताना पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांचे नेतृत्व तत्कालीन परीस्थितीमध्ये करून केके रेंजला स्थगीती मिळवून दिलासा दिला होता.सुपा येथील एमआयडीसी उभारणीसाठी व लघुउद्योग आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.रयत शिक्षण संस्थेत अनेक गोरगरीब बेरोजगारांना नोकरी मिळवून दिल्या.
पारनेर तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती पद सांभाळताना पंचायत समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले.कार्यकर्त्यांचा संच निर्माण केला.जिल्हा परिषदेमध्ये काम करताना एक अभ्यासू सदस्य म्हणून जवळपास १३ वर्षे काम केले.निस्पृह नेता म्हणून त्यांची ओळख होती.दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्याला सर्वाधिक पिक विमा मिळवून देण्यात वसंतरावांचा सिंहाचा वाटा आहे.माजी खा.शंकरराव काळे यांचे ते निष्ठावंत अनुयायी होते.खा.शंकरराव काळे यांच्या खासदार निधीतून रस्ते,विज,पाणी आदी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले.गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पारनेर तालुक्यात भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. तसेच त्या द्वारे तालुक्यातील आनेक गरजूनां रोजगार दिला.
आमदार असताना इतर संस्थाच्या ४0 शाळांना शासनाकडून परवानगी मिळवून दिली.दुष्काळी पारनेरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोरवाडी धरण पाणी परिषद,भाळवणी पाणी परिषद,कान्हूरपठार पाणी परिषदांचे नेतृत्व केले होते.एक सर्वसामान्यांचा कार्यकर्ता निष्कलंक राजकारणी गोरगरीबांचा तारणहार म्हणूनच त्यांची पारनेर तालुक्यात एक वेगळी ओळख होती.
दांदाचे तालुक्यातील विकास व प्रगतीमधील योगदान अनुभवायचे असेल तर ते तालुक्याच्या ढवळपुरी ते पळशी वनकूटे खाडकवाडी धोञे मांडवे या भागातील आदिवासी- -धनगर व दलित बांधवासाठी केलेल्या कामातुन पाहवयास मिळेल.खऱ्या अर्थांने ते गोरगरीब जनतेचे मसिहा होते. तालुक्यात सुसंस्कृत व विकासाचे राजकारण करताना त्यांनी कधी कोणता भेदाभेद केला नाही.तालुक्यातील उमद्या व हुशार आश्या अनेक तरुणांना त्यांनी राजकरणात आणले.त्यांना पदे दिले व्यवसाय निर्माण करण्यासाठी उभारी दिली. आजही तालुक्याच्या पहिल्या फळीत दिसणारे जवळपास निम्म्याहुन अधिक नेते कधीकाळी दादांचे शिष्य होते.
आ.दादांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलु होते..वरवर शांत व संयमी दिसणारे दादा आतून तितकेच निर्भीड व खंबीर होते. एकदा ९३ च्या दंगली त नगर शहरात अडकलेल्या त्यांच्या तुकाराम नावाच्या कार्यकर्त्यांला पायी जावून त्यांनी वाचवले होते .पारनेरमध्ये त्यांनी केलेल्या विकासकामाच्यां उदघाटन प्रंसगी निर्माण झालेल्या पेच प्रंसगी त्यांच्या विरोधात आर्वाच्य भाषेत विरोधी घोषणा देणारा हाजोरांचा जमाव दादांच्या एकाच शांत व संयमी इंन्ट्री ने बाजूला पांगलेला आजही स्मरणात आहे . अडचणीत सापडालेल्या तालुक्यातील आख्या लोणी गावाचे लाईट बिल कधिकाळी दादांनी भरले होते. दादां वर काहींनी पुञ प्रेमाचे आरोप देखील केले. परंतु याच दादांनी त्यांच्या दारात स्वतः हुन चालून आलेला लाल दिवा स्वतःच्या मुलांना न देता त्याःच्यां एका निष्ठावंत कार्यकर्त्यांस दिल्याच उदाहरण कुठे बघायला मिळणार नाही. जिल्हा परिषदेच्या आवारात असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली उभे राहुन लोकांचे प्रश्न सोडवणारा लोकप्रिय लोकनेता ते स्वतः च्या आयुष्यातील शेवटच्या अंतिम समयी देखील गायकवाड नावाच्या त्यांच्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्या उपजिवीके साठी पैशाची तरतुद करणारा गरीबांचा कैवारी असे अनेक रुप आ.दादांचे आजही स्मरणात आहे. पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्याला आदरणीय दांदाचे लाभालेल नेतृत्व हे एक वरदान होत...
आ.दादांना भावपूर्ण आदरांजली...