--> एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री : सुनील फापाळे | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री : सुनील फापाळे

एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री : सुनील फापाळे मुख्यमंत्री पदाचा शिंदे साहेब सर्वसामान्यांसाठी वापर करतील  सुनील फापाळे...

एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री : सुनील फापाळे

मुख्यमंत्री पदाचा शिंदे साहेब सर्वसामान्यांसाठी वापर करतील 

सुनील फापाळे यांनी शिंदेसाहेबांन सोबतच्या आठवणींना दिला उजाळा





पारनेर प्रतिनिधी :
राज्यातील राजकारणात उलथापालत करत भारतीय जनता पार्टीच्या मास्टर स्ट्रोक नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व सर्वसामान्य शिवसैनिक त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांना व एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना मोठा आनंद झाला आहे. 
पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावचे सुनील फापाळे सर हे एकनाथ शिंदे साहेबांसोबत अनेक वर्ष ठाणे या ठिकाणी काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांचे एकदम प्रेमाचे व जवळचे संबंध राहिले आहेत. ठाणे परिसरामध्ये व पारनेर तालुक्यात एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. शिक्षक शिवसेनेमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे शिवसेना संघटनात्मक बांधणीमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून सुनील फापाळे सर यांनी काम केलेले आहे. 


एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्या नंतर सुनील फापाळे सर यांच्या सोबत संवाद साधला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विषयी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले एकनाथ शिंदे साहेब हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते असून सर्वांना सोबत घेऊन जात नेहमी काम करण्याची त्यांची पद्धत ही त्यांचे प्रखर नेतृत्व सिद्ध करते. एक हिंदुत्ववादी कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी समाज हितासाठी मोठे काम उभे केले. त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांचा आम्हाला नेहमी आधार वाटतो. शिक्षक संघटनेमध्ये मी काम करत असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचे मला व माझ्या सहकाऱ्यांना नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एकनाथ शिंदे साहेब यांचे प्रखर नेतृत्व निर्माण झाले. 



गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिंदे साहेबांचे कार्य आमच्यासारख्यांना जवळून पाहायला मिळत आहे. थेट सर्वसामान्य जनतेशी संपर्क असलेला हा नेता आज मुख्यमंत्रीपदी विराजमान होत असताना आत्याआनंद होत आहे. वंचित घटकाला न्याय देण्याचा खऱ्या अर्थाने शिंदे साहेब प्रयत्न करतील असे मत यावेळी बोलताना ठाणे जिल्हा शिक्षक संघटना अध्यक्ष ज्ञानदाता शैक्षणिक संकुल, मुंबई अध्यक्ष शिव मंदिर सेवा समिती संस्था गारगुंडी अध्यक्ष असलेले व पारनेर तालुक्याचे भूषण ग्रामीण भागामधून जाऊन ठाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकांचे नेतृत्व करत असलेले एकनाथ शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय सुनील फापाळे सर यांनी यावेळी एकनाथ शिंदे साहेब यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी बोलताना सुनील फापाळे सर हे अभिमानाने त्यांच्याविषयी बोलत होते. पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील सुनील फापाळे सर यांचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत मित्रत्वाचे असलेले सबंध हे नक्कीच तालुक्याच्या दृष्टीने भूषणावह असून तालुक्यातील विकासात्मक कामासाठी याचा फायदा निश्चित होईल.


तालुक्यातील गारगुंडी येथे एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती भेट

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेब यांनी 2019 साली पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना सुनील फापाळे सर यांच्या घरी गारगुंडी या ठिकाणी भेट दिली होती. सुनील फापाळे सर हे एकनाथ शिंदे यांचे एकदम जवळचे निकटवर्तीय व सहकारी म्हणून पारनेर तालुक्यात व ठाणे जिल्ह्यामध्ये ओळखले जातात. गारगुंडी या ठिकाणी भेट दिल्यामुळे सुनील फापाळे सर व त्यांचे असलेले जवळचे संबंध हे निश्चितच अधोरेखित होतात.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री : सुनील फापाळे
एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री : सुनील फापाळे
https://lh3.googleusercontent.com/-wVG8bDgT9Dk/Yr8fIjoN9-I/AAAAAAAAReQ/0wJwu-9jj3w1KnZ5bZPPb-1NSQ2Afr-JgCNcBGAsYHQ/s1600/IMG-20220701-WA0105%257E2.jpg
https://lh3.googleusercontent.com/-wVG8bDgT9Dk/Yr8fIjoN9-I/AAAAAAAAReQ/0wJwu-9jj3w1KnZ5bZPPb-1NSQ2Afr-JgCNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220701-WA0105%257E2.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_15.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_15.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content