काणेवाडीत भीज पावसाने घर कोसळले; संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथील सुदाम गणपत पवार यांचे काक...
काणेवाडीत भीज पावसाने घर कोसळले; संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथील सुदाम गणपत पवार यांचे काकणेवाडी व कान्हूर पठार शिवेलगत असलेले राहते घर सततच्या सुरू असलेल्या भीज पावसाने कोसळले आहे. पवार यांची परिस्थिती हालाखीची असल्याने संपूर्ण कुटुंब उघडयावर आले आहे. पवार यांना हे घर २००१-०२ साली घरकुल योजनेत मिळाले होते. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने भिंतीमध्ये पाणी जिरल्याने ते कोसळले आहे, त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्य याचे नुकसान झाले आहे.
या घटनेत पवार यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, कुटुंबातील सदस्य विक्रम सुभाष पवार यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पवार यांना शासन स्तरावरून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अशोक वाळुंज, पोपट वाळुंज, चिमाजी वाळुंज, गोरख वाळुंज तसेच काकणेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
COMMENTS