अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर माळीवाडा पाचपीर चावडी येथील दरबार फॅब्रिकेशन च्या कारागिरांनी तयार केलेल्या फोल्डिंग जिन्याचा सर्वत...
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर माळीवाडा पाचपीर चावडी येथील दरबार फॅब्रिकेशन च्या कारागिरांनी तयार केलेल्या फोल्डिंग जिन्याचा सर्वत्र महाराष्ट्रात कौतुक होत असून कौतुकाची थाप देण्यासाठी अफजल भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने कारागिर एजाज खान, समीर बागवान, आसिफ पठाण यांचा सत्कार करताना उद्योजक पै.असलम शेख, फिरोज कुरेशी, सोहेल शेख, सचिन छजलानी, उजेर सय्यद, भोलू पठाण, शाहरुख शेख, पै.नितीन रासकर, सर्फराज बंगडीवाला, युनूस शेख, जहांगीर खलिफा, अरबाज बागवान आदी उपस्थित होते.
फॅब्रिकेशन कारागिरांनी तयार केलेल्या वेल्डिंग जिन्याचा व्हिडिओ शेअर करीत तरुण कारागिरांचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ अगदी काही वेळातच लाखो लोकांनी पाहिला नगर येथील आसिफ पठाण, समीर बागवान व एजाज खान हे तिघे तरुण दरबार फेब्रिकेशन मध्ये कारागीर म्हणून काम करतात काही दिवसापूर्वी शहरातील जुनी महानगरपालिका येथे ई सेवा केंद्राच्या कार्यालयात त्यांना जिना बसवण्याचे काम मिळाले दोन कार्यालया मध्ये रुंदी ने कमी असलेल्या जागेत त्यांना जिना बसवायचा होता. या तिघांनी लोखंडी जिना बसविला मात्र जागा कमी असल्याने तो अडचणीचा ठरू लागला त्यामुळे हा जिना काढून टाकावा लागला आता जागा वाचून कसा जिना बसवता येईल असा विचार करू लागले यातील आसिफ पठाण याला फोल्डिंगच्या जिन्याची संकल्पना सुचली दुकानाचे मालक आरिफ पठाण यांनाही संकल्पना आवडली
असिफच्या संकल्पनेला समीर आणि एजाज यांनीही पाठबळ देत तिघांनी फोल्डिंगचा जीना तयार करून 13 जुलै रोजी भिंतीला बसविला आणि हा प्रयोग यशस्वी झाला एकाच वेळी पाच जण या जिन्यावरून जाऊ शकतात व जिना अनेक वर्ष टिकेल असा विश्वास जिना बनवणाऱ्या कारागिरांनी व्यक्त केले. तसेच या कारागिऱ्यांनी बनवलेल्या जिन्याचा व्हिडिओ उद्योजक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात या माध्यमातून ते भारतीयांचे कौशल्य जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतात महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटवर नगर येथील फॅब्रिकेशन कारागिरांनी तयार केलेल्या फोल्डिंग जिन्याचा व्हिडिओ शेअर करीत तरुण कारागिरांचे कौतुक केले आहे. त्यामुळे नगर शहरात देखील या कारागिरांचे अनेक उद्योजक कौतुक करत आहे
COMMENTS