वाढदिवस विशेष... संघटन कौशल्य असलेले प्रबळ नेतृत्व सागर मैड भाजपचे सक्रिय पदाधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण सु...
वाढदिवस विशेष...
संघटन कौशल्य असलेले प्रबळ नेतृत्व सागर मैड
भाजपचे सक्रिय पदाधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख
समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण
सुपा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
पारनेर प्रतिनिधी :
सुपा येथील सर्वसामान्य कुटुंबातील पारनेर तालुक्याच्या राजकीय पटलावरील उगवते नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे पारनेर तालुका सरचिटणीस सुपा गावचे माजी उपसरपंच सागर भास्करराव मैड यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी सामाजिक काम करत अनेक सर्वसामान्य लोकांना आधार देत उभे राहिले वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले आईच्या छात्र छायेखाली स्व कर्तुत्वावर त्यांनी यशाला गवसणी घालण्याचे ध्येय ठेवले सुसंस्कारी व संस्कारक्षम विचारसरणी घेऊन हे युवा नेतृत्व काम करत आहे. सन 2004 पासून सक्रिय राजकारणात त्यांनी पाऊल ठेवले शिवसेने सोबत त्यांनी आपल्या या प्रवासाला सुरुवात केली या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये पारनेर तालुक्याचे आमदार राहिलेले विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी साहेब यांना ते आपले राजकीय व सामाजिक मार्गदर्शक व गुरु मानतात. शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना सामाजिक काम हेच सर्वात मोठे त्यांनी भांडवल माननीय व सुपा परिसरामध्ये अनेक सर्वसामान्य आदिवासी गरीब दिन दलित घटकांना त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला.
कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली नसताना संघर्ष करत सर्वसामान्यांसाठी जगत सागर मैड हा युवक लढत राहिला या सर्व लढाईमध्ये मोठा भाऊ अमोल मैड हा नेहमी सावलीसारखा सागर सोबत त्याच्या इच्छा ध्येय माझ्या प्रति काम करण्याची जिद्द या कार्याला ताकद देत आहे.
कौटुंबिक असलेली ताकद हीच खऱ्या अर्थाने सागर मैड यास समाजसेवा करण्यास प्रोत्साहन देत आहे. सुपा परिसरामध्ये काम करत असताना सागर मैड यांनी युवक मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात जमविला. युवकांच्या प्रश्नांसाठी समस्यांसाठी व मदतीसाठी सागर रात्री अपरात्री धावून जाऊन काम करत असतो त्यामुळे त्याने आपल्या युवक सहकाऱ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळविले आहे. राजकीय प्रवासामध्ये संघर्ष करत असताना हिंदुत्वाशी एकनिष्ठ राहात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नेहमीच सागर मैड हे प्रयत्न करत असतात.
सागर मैड ही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नेहमी काम करत असतात त्या माध्यमातून आपल्या युवक सहकाऱ्यांना ते नेहमी व्यावसायिक दृष्टीने मार्गदर्शन करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात.
राजकीय विचारसरणी कधीही मनात न ठेवता नेहमी सामाजिक भूमिका घेऊन व संयमी शांत निर्णयक्षम विचार करून सागर मैड हे नेहमी समाज हितासाठी काम करत आहेत.
शिवसेने सोबत राजकीय प्रवास सुरू असताना 2017 साली युवा नेते सागर मैड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून पंचायत समितीची निवडणूक सुपा गणातून लढवली यावेळेस थोडं मताधिक्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या मधून पुन्हा उभारी घेत संघर्ष हा राजकीय प्रवासामध्ये करावा लागतो हे लक्षात घेऊन सागर मैड हे पुन्हा समाजाच्या सेवेमध्ये नव्या जोशाने काम करू लागले. व पुढे 2021 साली सुपा गावच्या प्रस्थापित व धनाड्य अशा उमेदवारासमोर ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते निवडून आले व त्यांना सुपा ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली. या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करत सुप्यासारख्या औद्योगिक वसाहत असलेल्या एका विकसनशील गावामध्ये ग्रामस्तरावर काम करताना अनेक प्रश्न मार्गी लावले सुपा गावच्या विकासासाठी त्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली. गावातील स्थानिक रस्ते वीज पाणी प्रश्न सुपा औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागली. सुपा गाव आदर्श गाव निर्माण झाले पाहिजे सुप्याची ओळख राज्यस्तरावर निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष संघटना बळकटीकरणासाठी सागर मैड हे प्रयत्न करत आहेत. तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर काम करताना सागर मैड यांनी भाजपाला नेहमीच ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना सागर मैड नेहमीच सकारात्मक व हिताचे पक्ष संघटनेसाठी अनुकूल असं कार्य करत असतात.
राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून काम करताना नेहमी संयमी भूमिका ठेवून काम करत असल्यामुळे एक वेगळीच ओळख समाजामध्ये निर्माण झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे असलेला थेट संबंध हा नेहमी तालुक्यात चर्चेचा ठरतो सुपा या ठिकाणी सागर मैड यांच्या जनसंपर्क कार्यालयाला आजपर्यंत वरिष्ठ पातळीवरील भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी वेळोवेळी भेटीगाठी दिल्या आहेत वरिष्ठ पातळीवर असलेले त्यांची सबंध निश्चितच या पुढील काळात तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील. सागर मैड सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व संस्कारक्षम नेतृत्वाला आता संधी देण्याची वेळ आली आहे. अशा कार्य कुशल युवा नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..
तालुक्यातील भाजपचा युवा चेहरा..
सागर मैड यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले संघटनात्मक काम हे प्रबळ असून नेहमी भाजपची भूमिका घेऊन ते काम करत असतात त्या माध्यमातून पारनेर तालुक्यामध्ये त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले असून प्रस्थापित अशा नेतृत्वाला त्यांनी आव्हान दिले आहे. सुपा परिसरामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी प्रबळ संघटना म्हणून पुढे आणली आहे.
कार्य कुशल संस्कारक्षम नेतृत्व..
सु स्वभावी शांत संयमी असे नेतृत्व म्हणून सागर मैड यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. नेहमीच हसतमुख असलेले व सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक कामासाठी प्रयत्न करणारे व सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी लढणारे एक तालुक्यात प्रबळ नेतृत्व सागर मैड यांच्या माध्यमातून निर्माण होत आहे.