शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत मुंबई प्रतिनिधी : विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अ...
शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत
मुंबई प्रतिनिधी :
विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होण्याचे पवारांनी या बैठकीत संकेत दिले. गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होऊ शकतात, असे पवार म्हणाले. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का याबाबत प्रश्न असल्याचेही पवार म्हणाले. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात जावे काम करत राहावे. निवडणूक लागल्या तरी तयारी असावी त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असे आदेश पवार यांनी दिले. दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.