मोटरसायकल चोरीचे सत्र तालुक्यात सुरू; ढवळपुरीतही बजाज पल्सर चोरली पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यात गेल्या महिन्यापासून टाकळी ढोकेश्वर, व...
मोटरसायकल चोरीचे सत्र तालुक्यात सुरू; ढवळपुरीतही बजाज पल्सर चोरली
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात गेल्या महिन्यापासून टाकळी ढोकेश्वर, वनकुटे येथून तसेच आता ढवळपुरी येथूनही मोटरसायकलची चोरी झाली असून तालुक्यात मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान आता ढवळपुरी येथे घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये लावण्यात आलेली बजाज पल्सर ही चाळीस हजार रूपयांची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरून नेली.
यासंदर्भात पापा रमजान शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दि. २५ जुलै रोजी रात्री ९ वाजता ते दि. २६ जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने शेडमधून मोटारसायकल क्र. एम. एच.१६ सी. एक्स ७८५३ लांबविली. रात्री शेख हे जेवण करून झोपले. पहाटे उठून ते घराबाहेर आले असता शेडमध्ये त्यांना मोटारसायकल आढळून आली नाही. त्यांनी मोटारसायकलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
ढवळपूरी तसेच परीसरातही विचारपूस करण्यात आली मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. मोटारसायकल चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर पारनेर येथे येउन त्यांनी चोरीची फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. बर्डे हे पुढील तपास करीत आहेत.
...