वासुंदे येथील स्व. सुदाम किसन झावरे यांचे शनिवारी प्रथम पुण्यस्मरण पारनेर/प्रतिनिधी : वासुंदे येथील स्व. सुदाम किसन झावरे (दादा) यांना आता ...
वासुंदे येथील स्व. सुदाम किसन झावरे यांचे शनिवारी प्रथम पुण्यस्मरण
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे येथील स्व. सुदाम किसन झावरे (दादा) यांना आता आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम शनिवार दि. १६ जुलै रोजी होत आहे. सुदाम किसन झावरे हे अतिशय मितभाषी, संयमी असे व्यक्तिमत्व होते. कष्टप्रद जीवन जगत त्यांनी संघर्ष करत आपल्या कुटुंबाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक राजकीय व सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय काम आहे मुंबई या ठिकाणी उद्योग व्यवसायानिमित्त असताना श्री. रंगदास स्वामी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांनी तेरा वर्ष काम केले. त्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक गोरगरीब घटकांना रोजगार व्यवसायानिमित्त सहकार्य केले. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी नेहमी समाजाचा विचार करतच आपले जीवन व्यतीत केले. अतिशय संयमी असलेले व्यक्तिमत्व वासुंदे येथील आपल्या सर्व सहकार्यांबरोबर प्रेमाने शेवटपर्यंत राहिले.
संघर्षमय जीवन जगत असताना त्यांनी आपल्या कुटुंबावर जे संस्कार केले ते खऱ्या अर्थाने समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आहेत.
अशा या शांत संयमी व्यक्तिमत्त्वाला आपल्यातून जाऊन आता एक वर्ष झाले. त्यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम म्हणजेच प्रथम वर्षश्राद्ध वासुंदे येथे शनिवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
दरम्यान वासुंदे येथे साईप्रसाद मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम होणार असून झावरे कुटुंबाच्या वतीने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
सुदाम किसन झावरे यांच्या पश्चात पत्नी एक भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे. वासुंदे येथील प्रतिष्ठित झावरे कुटुंबातील सर्वांचे व वासुंदे येथील सर्व ग्रामस्थांचे ते प्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त साई प्रसाद मंगल कार्यालयामध्ये शिवव्याख्याते ह.भ.प.सागर महाराज मराठे (रत्नपिप्रि) (जळगाव) यांचे १ ते ११ किर्तन होईल. त्यांना किर्तन साथ : श्री रंगदास स्वामी, ईटकाई देवी वारकरी शिक्षण संस्था, अणे, शिंदेवाडी, ह.भ.प. लहु महाराज शिंदे हे देणार आहेत. या अध्यात्मिक सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन झावरे कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे.