संतोष वाडेकर यांनी शेतकऱ्यांसाठी निवडणूक लढवावी शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी निवडणूक लढवणे काळाची गरज भूमिपुत्र संघटनेचे प्रवक्ते संतोष हां...
संतोष वाडेकर यांनी शेतकऱ्यांसाठी निवडणूक लढवावी
शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी निवडणूक लढवणे काळाची गरज
भूमिपुत्र संघटनेचे प्रवक्ते संतोष हांडे
पारनेर/प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या हितासाठी गेली १०-१२ वर्षापासून कुठलाही स्वार्थ न पाहता भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी गरीब समाजाच्या हितासाठी शासन दरबारी नेहमीच आंदोलनात्मक भूमिका घेत शेतकरी चळवळ जिवंत राहण्यासाठी संतोष वाडेकर यांनी काम केले आहे. अशा या समाजभिमुख नेतृत्वाला खऱ्या अर्थाने कोणताही राजकीय सामाजिक हेतू न ठेवता खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संतोष हांडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान संतोष वाडेकर हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी लढणारे एक आक्रमक नेतृत्व आहे अशा या लढाऊ नेतृत्वाला खऱ्या अर्थाने आता सामाजिक राजकीय जीवनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे.
संतोष वाडेकर यांनी आजपर्यंत मोठ-मोठी आंदोलन केली शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेतली कांदा दर, दूध दर, चारा छावण्या, विजेचा प्रश्न, ऊस दर, पाण्याच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात असंख्य निर्णायक आंदोलन त्यांनी केली. प्रसंगी घरातील सोनं गहाण ठेवून मोर्चे काढले त्याचे आम्ही सर्व सहकारी साक्षीदार असल्याचे यावेळी संतोष हांडे यांनी सांगितले.
दरम्यान घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना कोणत्याही प्रकारची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर संतोष वाडेकर यांनी कष्टमय प्रवास करत शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला आहे. अशा या कृषी नेतृत्वाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
दरम्यान येणाऱ्या काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत पारनेर तालुक्यातही निवडणुका होत असून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले संतोष वाडेकर यांनी निवडणुकीत संधी मिळावी अशी तालुक्याच्या उत्तर भागातील जनतेची प्रामुख्याने मागणी आहे. अशी प्रतिक्रिया भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संतोष हांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
..