लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : सचिन वराळ निघोज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी पारनेर प्रतिनिधी : ल...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : सचिन वराळ
निघोज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी
पारनेर प्रतिनिधी :
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी जनतेच्या विकासासाठी समाज सुधारणेचे महत्वपूर्ण काम केले असून त्यांचे कार्यसमाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे. निघोज ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान वतीने पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान पदाधिकारी सतिष साळवे, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे व्यवस्थापक सचिन पंचरास, कचरु साळवे, मोहन साळवे, भिमराव साळवे, स्वप्नील साळवे, कैलास साळवे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, समतादूत बार्टी या सामाजिक संस्थेचे
पदाधिकारी सुलतान सय्यद आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
वराळ पाटील यावेळी म्हणाले निघोज येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाज कार्याचे अनुकरण करीत लोकाभिमुख विकासकामांना पाठबळ देत समाजाभिमुख काम करीत असल्या चे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान पदाधिकारी सतिष साळवे यांनी यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समाज कार्यामुळे अल्प संख्याक समाजाचा विकास झाला असून जनतेला पाठबळ मिळाले असल्या चे प्रतिपादन व्यक्त केले आहे. अल्प संख्याक समाजाचे नेते अस्लम भाई इनामदार यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तसेच मोहन साळवे यांनी आभार मानले.