गाव विकासासाठी एकत्र येण्याची गरज - आमदार निलेश लंके विरोली येथे विविध विकास कामाचे भुमिपुजन पारनेर प्रतिनिधी : गावाचा सर्वांगीन विकास हो...
गाव विकासासाठी एकत्र येण्याची गरज - आमदार निलेश लंके
विरोली येथे विविध विकास कामाचे भुमिपुजन
पारनेर प्रतिनिधी :
गावाचा सर्वांगीन विकास होण्यासाठी राजकिय मतभेद बाजुला ठेवुन एकत्र येण्याची गरज आसुन त्याशिवाय गावाची प्रगती होत नाही असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यानी केले .
पारनेर तालुक्यातील विरोली येथे तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुमारे ३८ लाख रुपयांचे विकास कामाचे भुमीपुजनप्रसंगी ते बोलत होते . यावेळी ग्रामस्था सह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
आमदार लंकेपुढे बोलताना म्हणाले की आपण समाजकारण राजकारण करताना मतभेदाचे न करता सर्वसमावेषक करतो निधी वाटप करताना गावाची लोकसंख्या व मतदान विचारात न घेता गावचे मुलभुत प्रश्न काय आहेत.
त्याची सर्वसामान्य जनतेला किती गरज आहे याचा विचार करून मतदारसंघात निधी वाटप करतो विरोली गाव जरी छोटे असले तरी मुलभुत प्रश्नाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही .
यावेळी पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी, विजवितरण विभागाचे अध्यक्ष चंदु ठुबे, जाणता राजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किरण ठुबे, बाजार समितीचे संचालक गंगाराम बेलकर यांच्यासह विरोली सह परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
COMMENTS