पारनेरला विरोध होत असल्यास वाघुंडे खुर्द येथे रुग्णालयाची उभारणी करा गावकऱ्यांची मागणी : अनेकांचे प्राण वाचण्यास होणार मदत सर्वसामान्यांच्या...
पारनेरला विरोध होत असल्यास वाघुंडे खुर्द येथे रुग्णालयाची उभारणी करा
गावकऱ्यांची मागणी : अनेकांचे प्राण वाचण्यास होणार मदत
सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी
पारनेर प्रतिनिधी :
आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून प्रयत्नाने सर्व व सोयींनीयुक्त रुग्णालय उभारणीसाठी पारनेरकरांचा विरोध होत असेल तर नगर-पुणे रस्त्यालगत असणाऱ्या वाघुंडे खुर्द (ता. पारनेर) गावच्या गावठाणच्या जागेत रुग्णालय उभारणी करावी. त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. सुपा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या मिटतील. त्यासाठी जागेसह सर्व सहकार्य करण्याची तयारी असल्याचे वाघुंडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा सुभाष पवार, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप मगर यांनी सांगितले.
नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त असली तरी यातील रुग्णांना तातडीची मदत देण्यासाठी असे रुग्णालय शिरूर ते नगरदरम्यान नाही. शिवाय सुपा एमआयडीसीतील कारखान्यात घडणाऱ्या
अपघातातील आपद्वस्तांसाठी तातडीची वैद्यकीय मदतीची सुविधा नसल्याने होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी ट्रामा सेंटर देणार असल्याचे सांगितले होते.
आता याला पारनेरकर विरोध करत असतील तर खऱ्या अर्थाने गरज असणाऱ्या आमच्या या भागात हे जवळपास १०० कोटी रुपयांचे रुग्णालय झाले तर या भागाचा आरोग्याचा प्रश्न मिटेल. त्यासाठी लागणारी गावठाणाची जागा देण्याबाबत तयारी असल्याचे सरपंच रेश्मा पवार व संदीप मगर यांनी दाखविली. त्यामुळे रस्त्यालगत होणाऱ्या सर्व सुविधांनी युक्त रुग्णालयाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत, सुपा परिसरच नाही तर तालुक्यातील कुठल्याही भागातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत येथे मिळू शकते, असे सरपंच रेश्मा पवार यांनी सांगितले. लवकरच याबाबत आमदार लंके यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
COMMENTS