स्वर्गीय सुदाम झावरे यांनी संस्कारक्षम कुटुंब बनवले : ह. भ. प. मराठे पारनेर/प्रतिनिधी : वासुंदे येथील अध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये नेहम...
स्वर्गीय सुदाम झावरे यांनी संस्कारक्षम कुटुंब बनवले : ह. भ. प. मराठे
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे येथील अध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच सक्रिय राहिलेले. मुंबई या ठिकाणी उद्योग व्यवसायानिमित्त कार्यरत असताना सहकार क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करत श्री रंगदास स्वामी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राहिलेले स्वर्गीय सुदाम किसन झावरे (दादा) यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी वासुंदे या ठिकाणी साईप्रसाद मंगल कार्यालयामध्ये शनिवार दि. १६ जुलै रोजी संपन्न झाला.
यावेळी शिवव्याख्याते ह.भ.प.सागर महाराज मराठे (रत्नपिप्रि) (जळगाव) यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये किर्तन संपन्न झाले त्यांना किर्तन साथ : श्री रंगदास स्वामी, ईटकाई देवी वारकरी शिक्षण संस्था, अणे, शिंदेवाडी, ह.भ.प. लहु महाराज शिंदे यांनी दिली.
यावेळी आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ह भ प सागर महाराज मराठे म्हणाले की हे वासुंदे येथील झावरे कुटुंब हे एक प्रतिष्ठित व आध्यात्मिक कुटुंब असून गावच्या सामाजिक जडणघडणीमध्ये स्वर्गीय सुदाम किसन झावरे यांचा असलेला सहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे आपल्या कुटुंबावर सुदाम किसन झावरे यांनी केलेले संस्कार हे नक्कीच यथायोग्य असून या झावरे कुटुंबाचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे अतिशय सुशिक्षित व सुसंस्कारी कुटुंब म्हणून हे कुटुंब परिचित आहे.
या कार्यक्रम प्रसंगी विविध सामाजिक राजकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवर वासुंदे गावचे सरपंच, उपसरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन व व्हा. चेअरमन व मुंबई शिंदेवाडी, अणे, पळसपुर या परिसरातून मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील यांनी सुदाम किसन झावरे यांच्या जीवन कार्यास उजाळा दिला व त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमासाठी स्वर्गीय सुदाम किसन झावरे यांचा मित्र परिवार झावरे कुटुंबाचे नातेवाईक हितचिंतक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे संदीप झावरे व नितीन झावरे यांनी आभार मानले.