पिंपळगाव जोगाचे पाणी पारनेर तालुक्यासाठी सोडा आमदार निलेश लंके यांची मागणी पारनेर/प्रतिनिधी : धरण क्षेत्रात चांगल्या प्रकारे पाउस झाल्याने...
पिंपळगाव जोगाचे पाणी पारनेर तालुक्यासाठी सोडा
आमदार निलेश लंके यांची मागणी
पारनेर/प्रतिनिधी :
धरण क्षेत्रात चांगल्या प्रकारे पाउस झाल्याने तसेच कुकडी प्रकल्प अंतर्गत पिंपळगाव जोगे धरण लवकरच पुर्ण क्षमतेने भरणार असल्याने पारनेर तालुक्यातील गावांसाठी पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी सोडण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती देवीभोयरे गावचे सरपंच विठ्ठलराव सरडे यांनी दिली आहे.
सरडे म्हणाले, देवीभोयरे, वडझिरे या गाव व परिसरात पाउस कमी प्रमाणात झाल्याने या गाव परिसरासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी या गावच्या शिष्टमंडळाने नुकतीच आमदार नीलेश लंके यांची भेट घेतली तसेच कुकडी प्रकल्प अंतर्गत पाणी साठ्याची माहिती त्यांना देत वडझिरे व देवीभोयरे गाव व परिसरातील जनतेसाठी पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी लगेच आमदार लंके यांनी कुकडी अधिकान्यांशी संपर्क साधत देवीभोयरे, वडझिरे गाव व परिसरातील तलावासाठी पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली.
कुकडी प्रकल्प अंतर्गत धरणे ६५ टक्के भरले असून पिंपळगाव जोगे धरण सुद्धा जवळपास ६५ टक्के भरले असून लवकरच हे धरण पुर्णपणे भरणार असल्याने आमदार लंके यांनी केलेली मागणी लवकरच पुर्णत्वास मंजूर होणार असून पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी देवीभोयरे, वडझिरे व परिसरातील तलावासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सरडे यांनी दिली आहे.