रांधे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम गायकवाड, व्हा. चेअरमन भिमाबाई आवारी टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील रांधे विविध...
रांधे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम गायकवाड, व्हा. चेअरमन भिमाबाई आवारी
टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील रांधे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमनपदी उत्तम लक्ष्मण गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी भिमाबाई हरिभाऊ आवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली
निवडणूक निर्णय अधिकारी श्री वाघमोडे साहेब व सेक्रेटरी श्री खणकर साहेब यांचे उपस्थितीत पार पडली.
सदर निवडणुकीत चेअरमन पदासाठी श्री गायकवाड उत्तम लक्ष्मण (मा. प्राचार्य) यांना सुचक म्हणुन श्री विजय सखाराम आवारी अनुमोदक श्री.संतोष भाऊसाहेब लामखडे, व्हाईस चेअरमन साठी
सौ.भिमाबाई हरिभाऊ आवारी यांचे उमेदवारी वर
सूचक म्हणुन विनोद जिजाबा फापाळे तर अनूमोदक बाळासाहेब आवारी यानीसहया केल्या चेअरमन पदी-श्री गायकवाड उत्तम लक्ष्मण, यांची तर व्हाईस चेअरमन पदी-सौ. भीमाबाई हरिभाऊ आवारी यांची निवड झाली. रांधे गावाच्या इतिहासात प्रथमच एका सुशिक्षित मागासवर्गीय उमेदवाराची चेअरमन पदी निवड करण्यात आली तर एका महिला प्रतिनिधीची ही
बहुमताने पुढील पाच वर्षासाठी
निवड झाली.
सदर निवडणूक पार पडण्यात
गावाचे सरपंच श्री अरुण नारायण आवारी , उपसरपंच श्री. संतोष प्रभाकर काटे यांनी अविरत मेहनत घेतली. तसेच या कामी तंटामुक्ती अध्यक्ष मा. चांगदेव थोरात, जेष्ठ नागरिक मा.जिजाबा फापाळे, देवराम आवारी, विठ्ठल लक्ष्मण आवारी, शंकर सरोदे, माजी चेअरमन प्रभाकर काटे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत सदस्य दिलीप आवारी, माजी चेअरमन बाजीराव आवारी, माजी चेअरमन सुरेश सरोदे, वरून सोनवणे, आप्पासाहेब काटे, भगवान पावडे, रामदास भोसले, अविनाश आवारी, माजी चेअरमन विलास आवारी, गोरख सरोदे,संजय काटे , माजी सरपंच राजेंद्र आवारी, साईनाथ झिंझाडं सुनील आवारी, अजित आवारी, बाळा बाळासाहेब गायकवाड, शाकीर तांबोळी, विलास चौगुले, रामदास शेटे, दस्तगीर तांबोळी, अमोल मस्क्युले, किरण आवारी यांनी विशेष सहकार्य केले. निवडणुक पार पाडली या निवडणुकीत सर्व संचालक यांनी निर्णय प्रक्रियेत शांततेने निवडणूक पार पाडली.