शिक्षण संस्थेत लोकसहभाग महत्वाचा : राहुल झावरे श्री गोरेश्वर विद्यालयात, भूमिपूजन, गणवेश वाटप व वृक्षारोपण टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी : ...
शिक्षण संस्थेत लोकसहभाग महत्वाचा : राहुल झावरे
श्री गोरेश्वर विद्यालयात, भूमिपूजन, गणवेश वाटप व वृक्षारोपण
टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आसुन मैलाचा दगड आहे. सृजनशिल नागरिक घडविण्याचे कामही याच ज्ञान मंदिरातुनच केले जाते मात्र या कामात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. कारण त्यातुनच आपलेपणाची भावना तयार होते असे प्रतिपादन पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी केले पारनेर तालुक्याती गोरेगाव येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव, येथे शौचालय भूमिपूजन इयत्ता ५ वीच्या नवीन विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम राहुल झावरे माजी सभापती व विद्यमान सदस्य पंचायत समिती पारनेर, यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल व्हिलेज गोरेगावच्या सरपंच सुमनताई बाबासाहेब तांबे होत्या.
अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या माध्यमातून, विद्यालयातील विद्यार्थी व सेवकांना अद्ययावत, शौचालयाचे भूमिपूजन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संदीपभाऊ नरसाळे यांच्या वतीने विद्यालयाला विविध वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. त्याचेही, मान्यवरांच्या शुभहस्ते रोपण करण्यात आले. संस्थेच्या वतीने विद्यालयाला अद्ययावत शौचालय मंजूर केल्याबद्दल, विद्यालयाचे प्राचार्य इनामदार सर यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार नंदकुमार झावरे पाटील व सचिव जी. डी. खानदेशे साहेब व सदस्य, राहुलभैय्या झावरे पा. यांना धन्यवाद दिले. याबरोबरच विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीसाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या देणगीतून गणवेश वाटप करण्यात आले. विद्यार्थी गणवेशासाठी, सरपंच सुमनताई बाबासाहेब तांबे यांचे कडून ५००० रुपये, संभाजीराजे नरसाळे, चेअरमन वि. का. से. सोसायटी गोरेगाव, ५००० रुपये, इंजि. दिपक रामदास काकडे यांचे तर्फे ३००० रुपये देणगी मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने राहुल झावरे यांनी देनगीदारांना धन्यवाद दिले व विद्यालयातील विविध उपक्रमास आपण असाच प्रतिसाद द्यावा. अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास उपसरपंच दादाभाऊ नरसाळे, दत्तात्रय नांगरे सर, अर्जुन चौरे, संदीप भाऊ नरसाळे, उमेश नरसाळे व्हा. चेअरमन सुरेश पातारे, ग्रा. सदस्य कुसनाथ नरसाळे, शरद नरसाळे यांच्यासह विद्यालयातील सुरेश वैरागर, कैलास खिलारी, मंगेश काळे, श्रीम. कमल औटी, श्रीम. मंजुषा शिंदे, ज्योती वाघ, सुजाता नरसाळे, सुरेखा सुंबे, किरण उमाप, मारुती भालेराव, श्रीम. अनुपमा सोबले, संजय मारवाडे, श्रीम. संध्या नरसाळे, नंदकुमार गावडे, आनंदा काकडे, यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब खिलारी, सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र लोंढे यांनी केले.