संदीप वराळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निघोज येथे रक्तदान शिबिर १५२ रक्तपिशव्यांचे संकलन; युवक व महिला शिबिरामध्ये सहभागी पारनेर/प्रतिनिधी : ...
संदीप वराळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निघोज येथे रक्तदान शिबिर
१५२ रक्तपिशव्यांचे संकलन; युवक व महिला शिबिरामध्ये सहभागी
पारनेर/प्रतिनिधी :
निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतलेल्या रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला असून १५२ युवक व महिलांनी रक्तदान शिबीरात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. विळद येथील विखे पाटील हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे प्रत्येक वेळी सहकार्य मिळत आहे. निघोज ग्रामस्थ, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान घडवून आणण्याचे काम केले आहे. प्रारंभी संदीप पाटील वराळ यांच्या प्रतिमेला पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले , टाकळी ढोकेश्वरचे उपसरपंच रामभाऊ तराळ, युवा नेते किरण ठुबे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी प्रास्ताविक भाषणात गेली पाच वर्षात जयंती उत्सव असो की स्मृतीदिन तसेच विविध उस्तव या निमित्ताने संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.यावेळी सरपंच चित्राताई वराळ पाटील,उपसरपंच माऊली वरखडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, पत्रकार गणेश जगदाळे,सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील डी फार्मसी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आर. के. वराळ पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य भिमराव लामखडे, राळेगण थेरपाळ येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत कारखिले, संदेश म्हस्के, शरद कवडे, गणेश शिकारे, स्वप्नील ठुबे,किशोर ब्राम्हणे, सुलतान शेख, माजी सरपंच शिवा पवार, माजी सरपंच अशोकराव शेळके, प्रशांत गोरडे, युवा नेते रुपेश ढवण, अमोल सालके,जयदिप सालके,
भाऊसाहेब आढाव, माजी सरपंच सुभाष गाडीलकर, संदीप पाटील वराळ युवामंचचे पदाधिकारी निलेश घोडे, भाजपाचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव हारदे, लोणीमावळा सोसायटीचे मा. चेअरमन रावसाहेब शेंडकर, संचालक अशपाक पठाण, युवानेते साजिदभाई तांबोळी, श्रीकांत वराळ आदी व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मळगंगा पतसंस्थेचे संचालक राजेंद्र लाळगे व अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांनी केले. शेवटी संदीप पाटील युवा मंचचे पदाधिकारी निलेश घोडे यांनी आभार मानले.