वनकुटे येथे बालदिंडीचे आयोजन; विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील वनकुटे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्ह...
वनकुटे येथे बालदिंडीचे आयोजन; विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील वनकुटे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनकुटे आणि माळीवस्ती शाळेने दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व बालचमू वारकर्यांच्या वेशात दिंडीमधे दाखल झाले होते. टाळ, पताका, मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली. गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी दिंडीला सामोरे येत होते. वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. विठूनामाचा गजर करीत बाल वारकरी चालले होते. ग्रामपंचायतीच्या समोर रिंगन सोहळा झाला. मुले, मुली, महिला ग्रामस्थ यांनी फुगडीचा आनंद लुटला.
दिंडीमधे अनेक ग्रामस्थही सहभागी झाले होते. त्यामधे अध्यक्ष राजाभाऊ डहाळे, काळे साहेब, उपसरपंच बंडू भाऊ कुलकर्णी, सुरेश नाना गागरे, हभप रंगनाथ औटी, हभप रखमाजी भगत, हभप नारायण महाराज गागरे, संपत घोडके आदींसह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. नितीन रांधवन, भानुदास गागरे यांनीही दिंडीचे स्वागत केले. दिंडीची सर्व जबाबदारी वनकुटे शाळेचे मुख्याध्यापक सुनील खामकर सर, माळीवस्ती शाळेच मुख्याध्यापक आनंद झरेकर गुरूजी, दादाभाऊ नवले सर, बाळासाहेब हारदे सर, श्रीमती झावरे मॅडम, श्रीमती सुलोचना कांबळे मॅडम यांनी पार पाडली.
सर्व शिक्षकांचे ग्रामस्थांनी कौतुक केले व आभार मानले. शाळेमध्ये आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली. मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक आनंदा झरेकर यानी आभार मानले.