पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचवा : ओंकार गुंड पारनेर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची बैठक पारनेर/प्रतिनिधी : राज्यात सत्ता परिवर्त...
पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचवा : ओंकार गुंड
पारनेर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची बैठक
पारनेर/प्रतिनिधी :
राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून सध्या सत्ताधारी गटासमोर उभा असून शरद पवार साहेब, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आपल्याला भविष्यात विद्यार्थ्यांचे युवकांचे युवतींचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरीब जनतेचे व समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना कटिबद्ध असून या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक आंदोलनात्मक भूमिका घेत सर्व घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी काम करेल असे मत पारनेर या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष ओंकार गुंड यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या पक्ष संघटनेच्या वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी तसेच पक्ष संघटनेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेश संघटक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी रविवारी दि. ३ जुलै रोजी पारनेर या ठिकाणी तालुका संघटनेची बैठक घेतली.
आमदार निलेश लंके यांच्या पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तुषार गाडेकर, पारनेर तालुकाध्यक्ष प्रशांत गोरडे यांनी “गाव तिथे शाखा” या उपक्रमा संदर्भात मार्गदर्शन केले.
त्या ठिकाणी पारनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच सौरभ क्षीरसागर यांची संघटनेच्या उपाध्यक्ष पदी, सचिन गाडीलकर यांची सरचिटणीस पदी तर विशाल गागरे यांची सचिव पदी निवड करून, जिल्हाध्यक्षांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी पारनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष रुपेश लंके, विकास गिरी, श्रीलेश मेसे, हर्षदा मापारी, संघटक सौरभ भोंडवे, प्रतिभा भोगाडे हे पदाधिकारी उपस्थित होते.