सुनील गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा उपक्रम ओंकार गुंड यांनी राबवला जिल्हाभर उपक्रम वृक्ष लागवड करत दिला सा...
सुनील गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा उपक्रम
ओंकार गुंड यांनी राबवला जिल्हाभर उपक्रम
वृक्ष लागवड करत दिला सामाजिक संदेश
अहमदनगर/प्रतिनिधी :
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांच्या वतीने व जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याभर वृक्षारोपण प्रत्येक तालुक्यात करण्यात आले.
तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करत सुनील गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत गव्हाणे यांचा वाढदिवस अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला.
दरम्यान वृक्षरोपण करणे हि काळाची गरज आहे. निसर्गाला दुरावून आपण जीवन जगुच शकत नाही. पर्यावरणाचा र्हास टाळायचा असेल तर प्रत्येकानी वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असुन त्यामुळे होणारे दुष्परिणाम समाजाच्या दृष्टीकोणातुन हानीकारक आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी तरुणांनी भविष्याचा अर्थातच पर्यावरणाचा विचार करुन वृक्षलागवड करायला हवी आपण प्रत्येकांनी झाडे लावली पाहिजेत,आणि जगवली हि पाहिजे हा सामाजिक संदेश समोर ठेवून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत हा उपक्रम आम्ही राबवला असल्याचे मत अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की सुनीलदादा गव्हाणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना बळकटीकरणासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असून राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे संस्थापक आमचे मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब कर्जत जामखेड चे आमदार युवकांचे नेत रोहित दादा पवार तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी बळकटीकरणासाठी व राष्ट्रवादीचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असून संघटना निश्चितच बळकट करून राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी संघटनेतील पदाधिकारी प्रयत्नशील आहे.
दरम्यान हा कार्यक्रम राबवून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने एक सामाजिक वैचारिक संदेश दिला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश आघाव, योगेश झेंडे, संकेत वांडेकर जिल्हा सरचिटणीस तुषार गाडेकर, सुरज लष्कर, जिल्हा संघटक आकाश भोसले, तालुकाध्यक्ष प्रशांत गोरडे, ओंकार झावरे व संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.