व्हिजन ठेवून शिक्षण घेतल्यास यश : भाऊसाहेब शिंदे ढोकेश्वर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पारनेर प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी ...
व्हिजन ठेवून शिक्षण घेतल्यास यश : भाऊसाहेब शिंदे
ढोकेश्वर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पारनेर प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी जिद्द, कष्ट, चिकाटी व व्हिजन ठेवून शिक्षण घेतल्यास यश निश्चित्त मिळत असते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री. ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यायालयात १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश जावळे होते. याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे, सर्जेराव रोकडे, गो. या. रोकडे, भाऊसाहेब महाराज रोकडे, योगेश रोकडे, अनिल गायकवाड, राजेंद्र रोकडे, भाऊ शिंदे, संदीप खंडाळे, मंगेश रोकडे, सुरेश सैद, निवृत्ती शिंदे, शिवाजी खामकर आदी उपस्थित होते.
यावेळी दहावीतील यशवंत प्रल्हाद भालेकर, दिव्या ज्ञानदेव सुंबरे, तनिष्क मंगेश वाळुंज, साक्षी बाळू डोंगरे, सिद्धार्थ सुधाकर जाधव, रोहित संतोष शिंदे, चैतन्य मारुती अनंत, सई आनंदा झरेकर, प्रज्वल बाळशीराम कारंडे, प्रांजली गंगाधर धावडे, ज्ञानेश्वरी बाबासाहेब निवडुंगे, गायत्री कैलास देशमुख, आविष्कार बाळासाहेब गिरी, गौरी ज्ञानदेव पायमोडे, तर बारावीच्या रुपाली शिंदे, सुचिता पुंडे, शुभांगी केदारी, जनार्धन शिंदे, सारिका धरम, ऋतुजा चौगुले, विज्ञान शाखेच्या समिक्षा औटी, प्रीती झावरे, सायली मंचरे, साक्षी दाते, आदिती बेलकर आदी विद्यार्थ्यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे म्हणाले, या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुण असून, त्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आजचे युवक हिच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी निव्वळ पुस्तकी ज्ञान न घेता अवांतर वाचन करावे, त्यामुळे ज्ञान वृद्धिंगत होते.
यावेळी मोहन रोकडे यांनी गोरगरीब सहाय्यता निधीस पाच हजार रूपये देवून या विदयालयाच्या माजी विदयार्थ्यांना आदर्श घालून दिला. प्रास्ताविक बाळासाहेब निवडुंगे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल ठाणगे योनी केले. भाऊसाहेब हिंगडे यांनी आभार मानले.