निघोज आरोग्यकेंद्रात डॉक्टर कागदावरच शिवबा संघटनेची आक्रमक भूमिका पारनेर प्रतिनिधी : निघोज आरोग्यकेंद्र हे निघोज, देविभोयरे, पठारवाडी, देवि...
निघोज आरोग्यकेंद्रात डॉक्टर कागदावरच
शिवबा संघटनेची आक्रमक भूमिका
पारनेर प्रतिनिधी :
निघोज आरोग्यकेंद्र हे निघोज, देविभोयरे, पठारवाडी, देविभोयरे, गुणोरे, व आजुबाजुच्या गोरगरीब जनतेसाठी वैदयकिय उपचाराचे महत्वाचे ठिकाण आहे. लोकसंख्या मोठी असल्याने याठिकाणी शासनाने दोन डॉक्टर उपलब्ध केलेले आहे. दिवसा व रात्री. मात्र रात्रीचे डॉक्टर फक्त कागदावर उपलब्ध असल्याने रात्री अपरात्री अनेक ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. काहि पेशेंट मागील काळात दगावलेहि आहे. वारंवार तक्रार करूनही सुधारणा नाही. सर्वात प्रमुख मागणी हीच आहे कि रात्री याठिकाणी डॉक्टर उपलब्ध असायलाच हवा.
याठिकाणी अनेक जागा रीक्त आहेत त्याबाबत ही अनेक वेळा शिवबा संघटनेने पाठपुरावा केला आहे. ती पदे ही तातडीने भरली पाहिजे. याठीकाणी डॉक्टरची भरती झाली मात्र डॉक्टर जर फक्त कागदावरच असणार असेल तर जनतेला काय फायदा ? असा प्रश्न शिवबा संघटनेने उपस्थित केला आहे. मात्र हे यापुढील काळात सहन केले जाणार नाही. शिवबा संघटना व ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. १५ दिवसांत सुधारणा व निर्णय न झाल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिली.
दरम्यान यासंदर्भात निवेदन सबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी अनिल शेटे, शांताराम पाडळे, निलेश दरेकर, मनोहर राऊत, राजु भाऊ लाळगे, शंकर पाटील वरखडे, निलेश वरखडे, स्वप्नील लामखडे, संदीप कवाद, मच्छिंद्र लाळगे, पोपट वरखडे, बाबाजी शेटे, शैलेश ढवळे, जगन मगर, बाबाजी लामखडे, अंकुश वरखडे, राहुल शेटे, अविनाश लामखडे, स्वप्नील वरखडे, जयराम सरडे, दिनेश गायकवाड, शरद बोराडे, मोहन पवार, मोहन पठारे, किरण सुपेकर, गणेश चौधरी, संतोष येवले, संदीप येवले, आदि सहकार्यांच्या सह्या निवेदनावर आहेत.