जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड रविवारी पारनेर दौऱ्यावर.. पारनेरला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची बैठक पारनेर प्रतिनिधी : राष्ट्रवादी विद्यार्थी क...
जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड रविवारी पारनेर दौऱ्यावर..
पारनेरला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची बैठक
पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या पक्ष संघटनेच्या वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी व पक्ष संघटनेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश संघटक व अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड रविवारी दि. ३ रोजी पारनेर या ठिकाणी संघटनेच्या बैठकीसाठी येत आहेत.
पारनेर या ठिकाणी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत रविवारी सकाळी ११ वाजता पारनेर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व आमदार निलेश लंके साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी ही बैठक होत असून या बैठकीला विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार गाडेकर, पारनेर तालुका अध्यक्ष प्रशांत गोरडे व पारनेर तालुका उपाध्यक्ष विकास गिरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.