अल्पवयीन भाचीवर मामाचा अत्याचार पारनेर तालुक्यात घडली घटना पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यात अल्पवयीन भाचीवर तिच्या चुलत मामाने अत्याचार केल्याची...
अल्पवयीन भाचीवर मामाचा अत्याचार
पारनेर तालुक्यात घडली घटना
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यात अल्पवयीन भाचीवर तिच्या चुलत मामाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान पीडितेला नगर येथील बालसुधार केंद्रात ठेवण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीत शिकत आहे. तिचा चुलत मामा नऊ जुलै रोजी घरी आला होता. त्या दिवशी पीडिता, तिची आई व मामा रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात होते. पीडितेची आई झोपल्यानंतर मामाने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. १७ जुलै रोजी तो पुन्हा मुलीच्या घराजवळ आला. ती घराबाहेर आली असता, त्याने तिचे दुचाकीवरून अपहरण केले. मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्याने घरातील व्यक्तींनी तिची शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. तिच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीने मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात दिली होती.
COMMENTS