लंके प्रतिष्ठानने पारनेर कारखाना साईटवर हॉस्पीटल उभारावे कारखाना बचाव समितीचा प्रतिष्ठान समोर प्रस्ताव पारनेर विशेष प्रतिनिधी : पारनेर येथ...
लंके प्रतिष्ठानने पारनेर कारखाना साईटवर हॉस्पीटल उभारावे
कारखाना बचाव समितीचा प्रतिष्ठान समोर प्रस्ताव
पारनेर विशेष प्रतिनिधी :
पारनेर येथे निलेश लंके प्रतिष्ठान तर्फे सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल व वैद्यकिय सुविधा प्रकल्प पारनेर - सुपा रस्त्यालगत शासकीय भूखंडावर उभारण्यात येणार होता. पारनेर नगरपंचायतीच्या ठरावानंतर येथील शासकीय भूखंड लंके प्रतिष्ठानला देण्याला स्थानिकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प तालुक्यात इतरत्र हलवण्याची घोषणा पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकतीच केली आहे.
हा प्रकल्प तालुक्यात इतरत्र हलविण्यात येणार असेल तर, तो देवीभोयरे येथील पारनेर साखर कारखाना साईटवर उभारावा अशी
मागणी करणारा प्रस्ताव कारखाना बचाव समितीने आमदार लंके यांच्यासमोर ठेवला आहे.
पारनेर कारखाना साईटवर आज रोजी
१४० एकरचा भुखंड उपलब्ध आहे. सध्या हा भुखंड महसुल दप्तरी अवसायक (कार्यकाळ संपलेले) यांच्या नावावर आहे. अवसायक कार्यकाळ संपल्यामुळे आता या संस्थेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याची सहकार मंत्री यांची मंजुरी मिळाली आहे. प्रशासक मंडळ स्थापन झाल्यानंतर यातील काही भुखंड प्रतिष्ठानला हॉस्पीटल
उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
तसेच हे ठिकाण दळणवळणाचे दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७६१ लगत येते, येथे कुकडी व पिंपळगाव जोगा या दोन्ही कालव्यांचे पाणी उपलब्ध आहे, तसेच जवळच असणारे बाभुळवाडे पॉवर स्टेशन मुळे चोवीस तास विज उपलब्ध आहे. त्यामुळे हि जागा प्रतिष्ठानच्या नियोजित प्रकल्पासाठी योग्य असल्याचे कारखाना बचाव समितीच्या प्रस्तावात म्हटले आहे.
कारखान्याचा हा भुखंड तीन वर्षांपुर्वी पारनेरचे अवसायक यांनी विक्रीस काढला होता, परंतु कारखाना बचाव समितीने उच्च न्यायालयात धाव घेवून विक्रीला स्थगिती मिळवली होती. त्यामुळे हा भुखंड विक्रीपासुन वाचला होता.
सदर मालमत्ता हि पारनेरकरांची सार्वजनिक असुन त्यातील काही भाग लंके प्रतिष्ठानच्या हॉस्पीटल सारख्या सार्वजनिक उपक्रमाला देता येईल अशी माहिती बचाव समितीचे बबनराव कवाद व साहेबराव मोरे यांनी दिली . कारखाना बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला आहे.
आम्ही अतिशय चांगला प्रस्ताव प्रतिष्ठाण समोर ठेवला असुन तो
या भागचा विकास होणारा आहे.
या प्रकल्पासाठी तालुक्यात इतर ठिकाणी जागेचा शोध घेण्याऐवजी
हि जागा सार्वजनिक मालमत्ता आहे. व सार्वजनिक सुविधा प्रकल्पासाठी त्याचा वापर होत असेल तर, पारनेरकरांची त्यासाठी सहमती असेल, म्हणून हा प्रस्ताव लंके प्रतिष्ठानने स्विकारावा . बचाव समितीचे त्यांना पूर्ण सहकार्य राहील.
रामदास घावटे, बबन कवाद
पारनेर कारखाना बचाव समिती