वनकुटयातून मोटारसायकलची चोरी पारनेर प्रतिनिधी : वनकटे येथून राहत्या घरासमोर लॉक करून उभी केलेली हिरो कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरटयाने ल...
वनकुटयातून मोटारसायकलची चोरी
पारनेर प्रतिनिधी :
वनकटे येथून राहत्या घरासमोर लॉक करून उभी केलेली हिरो कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरटयाने लॉक तोडून चोरून नेली.
यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार वनकुटे येथील नितिश पंढरीनाथ हारदे यांनी आपल्या घरासमोर रात्री ९ वाजता मोटारसायकल लॉक करून उभी केली. व त्यांचे कुटूंब झोपी गेले. दुसरे दिवशी सकाळी ते उठले असता दारामध्ये हिरो कंपनीची मोटारसायकल (क्र. एम एच १६ बी क्यु ८२३४) ही उभी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता मोटारसायकल मिळून आली नाही.
त्यांनी पारनेर पोलिस ठाण्यात हिरो कंपनीची मोटारसायलची चोरी झाल्याची फिर्याद दिल्यानंतर पो. हे. कॉ. लोणारे यांनी घटनास्थळी भेट देउन पंचानामा केला. त्यानंतर अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक घनश्याम जन्म बळप यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ पो हे कॉ लोणारे हे पुढील कळ तपास करीत आहेत.
..