अण्णाभाऊंचे विकासासाठी समाज सुधारण्याचे काम : किरण तराळ टाकळी ढोकेश्वर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी पारनेर प्रतिनिधी : तालुक...
अण्णाभाऊंचे विकासासाठी समाज सुधारण्याचे काम : किरण तराळ
टाकळी ढोकेश्वर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामपंचायत मध्ये शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवि, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामपंचायत टाकळी ढोकेश्वर व ग्रामस्थ यांचे तर्फे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हारपुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी जनतेच्या विकासासाठी समाज सुधारणेचे महत्वपूर्ण काम केले असून त्यांचे कार्यसमाजासाठी प्रेरणादायी असल्या चे प्रतिपादन टाकळी ढोकेश्वर गावचे उपसरपंच किरण तराळ यांनी व्यक्त केले आहे .
टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थाच्या वतीने पुण्यतिथी कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ते बोलत होते. यावेळी टाकळी ढोकेश्वर गावचे सरपंच सौ. अरुणा प्रदीप खिलारी, उपसरपंच किरण तराळ, माजी सरपंच शिवाजी खिलारी, सामाजिक कार्यकर्ते श्रावणजी गायकवाड , सचिन आल्हाट,सुनील माकरे, भाऊसाहेब खिलारी ,बापूशेठ रांधवन ,संजय खिलारी, राजेंद्र अल्हाट, प्रकाश गायकवाड , देविदास अल्हाट, , लखन अल्हाट ,सोन्याबापू अल्हाट, यांच्यासह ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.