वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेत एलईडी संच भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी जुन्नर तालुका/बेल्हे प्रतिनिधी : ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था (...
वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेत एलईडी संच भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी
जुन्नर तालुका/बेल्हे प्रतिनिधी :
ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिंगोटे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला ई-लर्निंग साठी एलईडी संच भेट दिला आहे.
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल व कॉलेजचा (सीबीएसई) दरवर्षीप्रमाणे दोन्ही वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला असून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशांत शिंगोटे यांनी एलईडी संच शाळेला भेट दिला. यावेळी शाळेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी सिंग, पत्रकार रामदास सांगळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकीकरण व अत्याधुनिक शिक्षणाचे शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात आहे .कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. ही आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून शिंगोटे यांनी मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे या शाळेस एलईडी भेट दिली आहे.
सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या प्रशांत शिंगोटे यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला असून अनेक सेवाभावी संस्थांना मदत केली आहे. प्रशांत शिंगोटे यांनी एलईडी टीव्ही शाळेस भेट दिल्यामुळे त्यांचे संस्थेचे संस्थापक सावकार गुंजाळ, संस्थेचे सीईओ शैलेश ढवळे, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे व संचालक मंडळांनी त्यांचे आभार मानले. शिंगोटे यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.