पारनेर बाजार समितीत कांद्याची आवक घटली ! पारनेर प्रतिनिधी : नगर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (१० जुलै) कांद्याची आवक कमालीची...
पारनेर बाजार समितीत कांद्याची आवक घटली !
पारनेर प्रतिनिधी :
नगर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (१० जुलै) कांद्याची आवक कमालीची घटली असून शेतकऱ्यांनी सुमारे २ हजार ५६ कांदा गोण्याची विक्रीसाठी आणल्या होत्या.
आषाढी एकादशीमुळे कांद्याच्या आवकेवर परिणाम झाला. मागील आठवड्यात ३ जुलै रोजी पारनेर बाजार समिती ३ हजार ५३७ कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्या तुलनेत आज दीड हजार कांदा गोण्यांची अावक घटली.
पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी झालेल्या लिलावात ७ ते ८ लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये भाव मिळाला. एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती पारनेर बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.
सध्या खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. अनेक शेतकरी पंढरीच्या वारीला गेले आहेत. आज आषाढी एकादशी असून सध्या भाव कमी असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी काढताना दिसत नाहीत.
अहमदनगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ५२९ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यातून जिल्ह्यात ३७ लाख ९८ हजार १९५ टन कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु कांद्याच्या भावात घट झाल्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नसल्याचे चित्र आहे.
पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी (१० जुलै) कांद्याचे लिलाव झाले. यावेळी सुमारे २ हजार ५६ कांदा गोण्यांची आवक झाली होती. रविवारी झालेल्या लिलावात ७ ते ८ लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे १५०० ते १८०० रुपये भाव मिळाला.
एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये भाव मिळाला, तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ६०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती पारनेर बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.
चालू खरीप हंगामात नगर जिल्ह्यात सुमारे अवघ्या १९९७ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात घट झाल्यामुळे खरीप हंगामातील कांदा लागवडीत घट झाल्याचे दिसून येत आहे. कांद्याच्या भावात वाढ झाल्यास रब्बी हंगामातील कांदा लागवडीत वाढ होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.