शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्या : मोहनराव रोकडे पारनेर/प्रतिनिधी : राज्यात नव्याने आलेल्या शिंदे -फडणवीस सरकारने त्वरित शे...
शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्या : मोहनराव रोकडे
पारनेर/प्रतिनिधी :
राज्यात नव्याने आलेल्या शिंदे -फडणवीस सरकारने त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान जमा करावे अशी मागणी वडगाव सावताळ येथील शेतकरी नेते व अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे यांनी सरकारकडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली आहे.
दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी विविध योजना सरकारने राबवल्या सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले त्यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये खऱ्या अर्थाने आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु राज्यात सत्ता बदल झाला आणि भाजप प्रणित फडणवीस शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले आहे.
दरम्यान शासन स्तरावरती शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आता घेतले जाणे गरजेचे असून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले हा त्यावेळी घेतलेला निर्णय योग्यच होता. त्यामुळे अल्पभूधारक त्यामुळे शेतकरी आनंदी झाला त्याचवेळी महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारने सलग तीन वर्ष नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप चांगला निर्णय आहे परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आता गेले आहे त्यामुळे शेतकरी याची द्विधा मनस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हा अडचणी सापडला आहे.
नवीन आलेल्या फडणवीस शिंदे सरकारने शेतकऱ्यांची कुचंबना लक्षात घेता ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावे त्यामुळे हे ५० हजार रुपये अनुदान आता शेतकऱ्यांना कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी या अनुदानाची आतुरतेने वाट पाहत असून या आठवड्यात त्वरित शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत अशी मागणी पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील शेतकरी नेते मोहनराव रोकडे यांनी केली आहे.