बिहार पॅटर्न योजना पर्यावरण व समाजाच्या दृष्टीने लाभदायक : अनिल देठे पाटील बहिरोबावाडीत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण ! पारनेर/प्रतिनि...
बिहार पॅटर्न योजना पर्यावरण व समाजाच्या दृष्टीने लाभदायक : अनिल देठे पाटील
बहिरोबावाडीत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण !
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील किन्ही - बहिरोबावाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून बिहार पॅटर्न योजनेतंर्गत बहिरोबावाडी येथे शुक्रवारी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या उपस्थितीत जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. बहिरोबावाडी येथील प्राथमिक शाळेचे प्रांगण व भैरवनाथ मंदिर परिसरात चिंचेच्या वृक्षांची लागवड करण्यात आली या वेळी बोलताना शेतकरी नेते अनिल देठे पाटील म्हणाले की, तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांच्या अधिपत्याखाली बिहार पॅटर्न योजनेतंर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते व लागवड केलेल्या झाडांचे संगोपन देखील स्थानिक लोकांच्या माध्यमातून उत्तमरीत्या केले जाते.
यामुळे स्थानिक काहि गरजु लोकांना रोजगारही मिळतो व झाडांचे संवर्धनही चांगल्याप्रकारे होते त्यामुळे हि योजना पर्यावरण व समाज या दोन्हींच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरत असुन, यशस्वी देखील होत असल्याने या योजनेस अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य शरद व्यवहारे, माजी सदस्य रावसाहेब व्यवहारे, बाळासाहेब शिंदे, ठकाशेठ व्यवहारे, मोहन मोढवे, प्रविण व्यवहारे, किरण व्यवहारे, बापू व्यवहारे, भिकाजी व्यवहारे, गंगाधर देठे, मारूती सावंत, सुनिल साबळे, नारायण व्यवहारे, लक्ष्मण व्यवहारे, सौ.भामाबाई मोढवे, सौ.सुमन शिंदे, सौ.सुनिता व्यवहारे, प्राथमिक शिक्षिका श्रीमती सविता गायखे , श्रीमती संगिता रोहोकले व विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS