टाकळी ढोकेश्वरमध्ये प्रतिष्ठानने रुग्णालय उभारावे टाकळी ढोकेश्वरसह परिसरातील ४० गावांची मागणी पारनेर प्रतिनिधी : निलेश लंके प्रतिष्ठानतर्फ...
टाकळी ढोकेश्वरमध्ये प्रतिष्ठानने रुग्णालय उभारावे
टाकळी ढोकेश्वरसह परिसरातील ४० गावांची मागणी
पारनेर प्रतिनिधी :
निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे पारनेर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या ५०० बेडचे अद्यावत रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय जागेवर उभारण्यात यावे अशी मागणी परिसरातील ४० गावांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली आहे.
टाकळी ढोकेश्वर सरपंच अरुणा बाळासाहेब खिलारी बाजार समिती संचालक अशोक कटारिया, शिवाजी बेलकर, ज्येष्ठ नेते भागुजी झावरे, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, पोपट साळुंखे गुरुजी, युवा नेते अमोल उगले, माजी सभापती गंगाराम बेलकर, राजेंद्र चौधरी, अशोक घुले, शंकर चिकणे, नितीन चिकणे, रावसाहेब झावरे, भाऊसाहेब झावरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, सरपंच सोमनाथ आहेर, सरपंच प्रकाश गाजरे, सरपंच पियुश गाजरे, उद्योजक गोरख आहेर, सुनिता आहेर, सरपंच दिनेश घोलप, उपसरपंच सुरेश आंग्रे, संदिप चौधरी, रविंद्र राजदेव, सरपंच विशाल झावरे, उपसरपंच राजेंद्र झावरे, सरपंच संदिप ठाणगे,
सरपंच गणेश मधे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे, अश्पाक हवालदार, गंगाधर निवडुंगे, सोमनाथ बांडे, माजी उपसरपंच सुनील चव्हाण, सुनिता झावरे, शिवाजी ठाणगे, सरपंच गुड्डू धरम, बापुसाहेब शिर्के, उपाध्यक्ष रविंद्र गायके, रविंद्र राजदेव, युवराज मुळे, शशीभाई आंधळे, दत्तात्रय आंधळे, उपसरपंच अशोक न-हे, संजय रोकडे, माजी सरपंच राजेंद्र रोकडे, बाळु न-हे, मनोज शिंदे, जगदीश घागरे, रविंद्र ढोकळे, शिवाजी शिंगोटे, संभाजी वाळूंज, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब करंजेकर, सुभाष करंजेकर, कारभारी आहेर, सतीश तिखोळे यांनी केली आहे.
पारनेर येथील शासकीय गट नंबर ९६ मध्ये हे ५०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार होते. परंतु स्थानिक पातळीवर विरोध झाल्याने अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याचा इशारा आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दोन दिवसापूर्वी दिला होता. त्यामुळे हे रुग्णालय गट नंबर ९६२ मध्ये उभारण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
टाकळी ढोकेश्वर व गावाला परिसरातील जवळपास ३० ते ४० गावांचा संपर्क असल्याने व या गावातुन नगर कल्याण हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जात असल्याने अपघातांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.तर दुसरीकडे टाकळी ढोकेश्वर परिसरात गावांमध्ये आदिवासी ठाकर भिल्ल व धनगर समाज सह इतर मागास घटकातील अनेक रुग्णांना उपचारासाठी नगर पुण्याला जावे लागत आहे.
या परिसरात अनेक गोरगरीब शेतकरी व मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने कायम आर्थिक अडचणीला सामना करावा लागत आहे. या परिसरातील अनेक रुग्ण आर्थिक अडचणीमुळे दगावल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर मध्ये या रुग्णालयाची गरज असून आमदार निलेश लंके यांनी शासकीय भूखंडावर हे रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे.
रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा..
बाळासाहेब खिलारी म्हणाले ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून अद्ययावत ५०० बेडचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात गरजू व गोरगरीब जनतेला आरोग्याच्या मोफत वैद्यकीय सेवा व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.